Breaking News

कोरेगाव भिमा घटनेच्या चौकशीसाठी न्यायमुर्तीची नेमणूक लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रभारी न्या. विजया ताहिलरमाणींची भेट

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील दलितांवरील दगडफेकीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीची नेणूक करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशाची नियुक्ती करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामणींची भेट घेत त्यासंदर्भात विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार लवकरच …

Read More »

शेतमाल तारण कर्ज योजनेत शंभराहून अधिक बाजार समित्या पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम आणि अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल …

Read More »

कोरेगाव भिमा येथील घटनेमागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ शिव प्रतिष्ठानचा आरोप; भिडेंचा कार्यक्रम अखेर पोलिसांकडून रद्द

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या मागे संभाजी भिडे यांचा हात नसून त्या मागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. तसेच १ जानेवारी रोजी भिडे हे कोरेगाव भिमा येथे नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी संबध असणे शक्यच नसल्याचा दावा शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या मुंबई विभागाचे कार्यवाह …

Read More »

आपची संभाजी भिडेंच्या अटकेसाठी ऑनलाईन पिटीशन प्रीती शर्मा मेनन यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी जमलेल्या दलित समाजाच्या विरोधात हल्ला करण्यासाठी उद्युक्त केल्याप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे भिडे यांना अटक करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात येणार असून या पिटीशनवर जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्या असे आवाहन …

Read More »

हसमुख चेहऱ्याचे राजकारणातील वसंत डावखरे मित्र गेले सर्व पक्षिय नेत्यांकडून शोक व्यक्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांचे मित्र तथा राजकारणातील चमत्काराची किमया दाखविणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे काल रात्री गुरूवारी निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ठाण्यातील हरी निवास येथील …

Read More »

भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविणार मुख्यमंत्र्याशी चर्चा करून धोरण तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांच्या चाव्याने झालेल्या रेबीजच्या रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज …

Read More »

दलित तरूणांच्या विरोधातील कोंबीग ऑपरेशन बंद करावे प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र बंद नंतर आज दिवसभरात ठिकठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या दलित तरुणांची कोबींग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबवावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भेट घेतली. त्यानंतर …

Read More »

दलितांच्या विरोधात मेसेजस करणाऱ्यांवर कारवाई कधी? मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेतूपुरस्सर निर्णय घेतल्याची भावना

मुंबईः प्रतिनिधी १ जानेवारी दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर कोरेगाव भिमा आणि सणसवाडी, शिक्रापूर येथील समाजकंटकांनी दगडफेक, वाहनांची जाळपोळीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदच्या कालावधीत काही ठिकाणी हिसंक कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर …

Read More »

कर विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोन दिवस रजा आंदोलन राज्यातील ११ हजार कर्मचारी संपावर गेल्याने कर वसुलीचे काम ठप्प

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील उद्योग आणि दुकानदारांकडून वस्तू व सेवा कर गोळा करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून दोन दिवसांच्या सामुहीक रजा आंदोलनाच्या मार्फत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कर वसुलीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावर होणार आहे. पूर्वीचा विक्रीकर तर आताचा महाराष्ट्र वस्तू व …

Read More »

जिग्नेश मेवाणीला परवानगी नाकारत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सामाजिक तणाव वाढेल म्हणून पोलिसांची कारवाई

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल बुधवारी दलित संघटनांसह डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यानंतर छात्र भारतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र समेंलनाला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि दिल्लीच्या जेएनयुचा विद्यार्थी उमर खालीद यांना आमंत्रित केल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी …

Read More »