Breaking News

जय मल्हार’नंतर देवदत्तचा ‘चेंबूर नाका’ एका दमदार भूमिकेत दिसणार देवदत्त

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकार केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचा ठसा रसिकांच्या मनावर असा काही उमटतो की, प्रेक्षक त्यांना पुन: पुन्हा नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुरतात. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे यांनी प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की, अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे …

Read More »

मन्सूर सिद्दीकींचा मराठी सिनेमा ‘राधे मुरारी’

मुंबई: प्रतिनिधी आज जागतिक पातळीवर मराठी सिनेमांचा उदो, उदो होत आहे. केवळ हिंदीतीलच नव्हे, तर इतर प्रादेषिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची पावलेही मराठीकडे वळू लागली आहेत. मन्सूर अहमद सिद्दीकी हे एक बॉलीवुडमधील एक मोठे नाव. ‘साजन चले ससुराल’, ‘रंग’, ‘ताकत’, ‘दिल ने फिर याद किया’ या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणारे मन्सूर सिद्दीकीही …

Read More »

एव्हेरग्रीन स्माईलवाली रेणूका नव्या रूपात दिसणार

मुंबई : प्रतिनिधी काही कलाकार नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या शोधात असतात. मराठीसोबतच हिंदीतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या काही मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. मोजके आणि निवडक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या रेणुका शहाणे या मराठमोळ्या गुणी अभिनेत्रीचाही समावेश या कलाकारांच्या यादीत आहे. राजश्री प्रोडक्शनच्या ‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटात सलमान खानच्या …

Read More »

हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन नागपूरात ? अंतिम निर्णय चर्चेअंती घेणार असल्याचे सां. कार्यमंत्री बापट यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशन साधारणत: तीन ते चार आठवड्याचे असते. त्यामुळे या कालावधीत सर्वच बाबींवर सविस्तर चर्चा करता येणे शक्य असल्याने नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्याऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याबाबतचा एक नवा प्रस्ताव पुढे आला असून याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी पत्रकारांशी …

Read More »

शेतकऱ्यांच्या फसवणूकीबद्दल सरकारवर गु्न्हा दाखल करा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ या कर्जमाफीच्या योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावट नावे आहेत. यासंदर्भातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे. मुख्यमंत्र्याकडून एकाबाजूला बँकांची नावे घेतली जात असताना दुसऱ्याबाजूला माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवाची बदली सरकारकडून केल्याने या संपूर्ण कर्जमाफी …

Read More »

मुंबईसह राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळणार संरक्षण पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आश्वासन

नागपूर : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, एमएमआर क्षेत्रातील आणि राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे असे निर्देश ता‍तडीने सर्व महापालिकांना देणार असल्याचे सांगत रेल्वे हद्दीतील विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनाही लवकरच कळ‍वण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याचतबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या …

Read More »

कोकणातील रिफायनरीवरून शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत असल्याचा शिवसेनेचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीच्या स्थापनेकरीता शिवसेनेचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी पुढाकार घेतल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही. तोच या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा खासदाराने पुढाकार घेतला नसून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे धादांत खोटे असून त्याबाबतची …

Read More »

वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार वीज मंत्र्यांच्या उत्तराच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज …

Read More »

माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपला कोणताही मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिला जात नसून विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर टीका करण्यात येत आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील आदींकडूनही टीका करण्यात येते. मात्र माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा असून तो आतूनच येत असल्याचे प्रतिपादन विधान …

Read More »

कामगाराला अपघात घडल्यास ठेकेदारासोबत व्यावसायिकालाही सहआरोपी करणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्याचे काम सुरु असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यापार्श्वभूमीवर एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात होवून बांधकाम करणारा कामगारास दुखापत अथवा दुर्दैवी घटना घडल्यास बांधकाम व्यावसायिकालाही ठेकेदारासोबतच सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री …

Read More »