Breaking News

गोंविदाच्या ‘साजन चले ससुराल’चा सिक्वेल येणार

मुंबई : प्रतिनिधी सध्याचा जमाना सिक्वेल चित्रपटांचा आहे. आज केवळ हिंदीतच नव्हे, तर मराठीतही गाजलेल्या सिनेमांचे सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या जुन्या चित्रपटांमधील कथानकात पुढे काय घडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांच्या ‘साजन चले ससुराल’ या …

Read More »

जमिन नसलेल्याला आणि शिवसेनेच्या आमदाराला कर्जमाफीचा लाभ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून सरकारची पोलखोल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळावा यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात केल्याचा दावा राज्य सरकारने केला. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचे नाव अर्ज भरलेला नसताना कर्जमाफीच्या यादीत आहे. तर उस्मानाबादमधील एक गुंठा जमिन नसलेल्या मुलाला कर्जमाफीची रक्कम मिळाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील …

Read More »

ऊस वजन काट्यात बनवाबनवी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना वजन काट्यात बनवाबनवी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सदर कारखान्याच्या वजन काट्याच्या ठिकाणी भरारी पथकाकडून छापे मारून कारखान्याच्या संचालकांवर कारवाई करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना काही साखर कारखान्यांकडून त्याच्या वजनात काटा …

Read More »

टोल मुक्त महाराष्ट्रासाठी १० हजार कि.मीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालवाधीत टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेनुसार राज्यातील लहान वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांनाही टोल मुक्ती कधी देणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याला टोलमुक्त करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रात ३० हजार कोटी रूपये खर्चुन १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते …

Read More »

राज्यातील १२ हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्यात १३०० शाळांपाठोपाठ १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट शालेय शिक्षण मंत्र्यांनी घातला आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील असा इशारा जनता दल (युनायटेड ) चे आमदार कपिल पाटील देत शिक्षणाच्याबाबत सरकारचे दुटप्पी आणि उदासीन धोरण सरकारचे असल्याचा आरोपही त्यांनी विधान परिषदेत केला. …

Read More »

राज्यातील २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ६९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ खात्यांच्या कर्जमाफीसाठी बँकांकडे पैसे पाठविण्यात आले आहे. तर २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले असून एकाही शेतकऱ्याचा अर्ज फेटाळला नसून आजही कर्जमाफीसाठी अर्ज आला तर तो मंजूर करण्याची तयारी असल्याची माहीती मुख्यमंत्री …

Read More »

राज्यातील सर्व शेती, शाळा, वसतिगृहांना सौर ऊर्जा पुरविणार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी भविष्यकाळात राज्यात कोळशावर आधारीत वीज शेतीला पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सोलर यंत्रणेचा वापर करून दिवसाची वीज शेतकऱ्याला पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शाळांना आणि सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सौर ऊर्जेवरील वीज पुरवठा करण्यात येणार असून शेती, शाळा आणि वसतिगृहांना सौर ऊर्जा …

Read More »

बोंडअळी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना मदत तीन वेळा देणार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे विधानसभेत आश्वासन

नागपूर: प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादनावर बोंडअळीचा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. त्यानुसार अशा शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून बोंडअळी बरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन …

Read More »

रोहयोवरील कामगारांचा असंघटीत कामगारात कधी समावेश करणार ? एकनाथ खडसे यांचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक कामांवर जातात. त्यांना किमान वेतनही दिले जाते. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला. विधानसभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपये तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि यवतमाळ …

Read More »