Breaking News

शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला

समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची …

Read More »

समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू आठ जणांनी स्वतःचे प्राण वाचविले तर आठ जण जखमी

समृध्दी महामर्गावरील अपघाताची मालिका सातत्याने सुरुच असून शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर राज्यभर हळहळ …

Read More »

मंत्रालयातील अधिकाऱ्याचा मुलगा युपीएससी परिक्षेच्या ऑल इंडियात रँकिंगमध्ये ८ वा प्रतिक प्रकाश इंदलकर यांच्या यशाने कौतुकाचा वर्षाव

युपीएसी परिक्षेच्या आयएएसचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यानंतर आज आयएफएस अर्थात केंद्रीय वन विभागाच्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला. परिक्षेत साताऱ्याचे प्रतिक प्रकाश इंदलकर हे उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे प्रतिक प्रकाश इंदलकर हे आयएफएस परिक्षेत ऑल इंडिया रँकिंग मध्ये ८ वा क्रमांक आला आहे. आयएफएस होण्यासाठी प्रतिक इंदरकर यांनी यापूर्वी दोन …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, इथे का समान नागरी कायदा नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समान नागरी कायद्यावर खोच टीका

देशात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सूचक विधानही केलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशात चार-चार कायदे लागू आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात जे आपल्याविरोधात आहेत, त्यांना एक कायदा. स्वत:च्या पक्षात आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना दुसरा कायदा. …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षपूर्तीचे गिफ्टः वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी कर्मचा-यांना सरकारने गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाईभत्ता …

Read More »

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मोर्च्याला महायुतीचे मोर्चाने प्रतित्तुर भाजपा आणि शिंदे गटही काढणार ठाकरे गटाच्या विरोधात मोर्चा

राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एकवर्ष पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा शनिवारी १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर धडकणार …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या या १२ महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करण्याचा दर्जा मिळणार

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. यानुसार आता या अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता …

Read More »

वर्षपूर्तीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आमदारांचा श्वास गुदमरू लागला… शिवसैनिकांच्या मनातील उद्रेकाला वाचा फोडण्याचं काम केलं

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षभरापूर्वी (महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात) शिवसेना आणि भाजपाच्या गोटात काय घडलं याबाबत बरीच माहिती उलगडून सांगितली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्यातल्या जनतेचं जगणं असहाय्य …

Read More »

पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय

राज्य शासन हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देणारे शासन आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाने लोकाभिमुख विविध निर्णय घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावांतील १२२ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे ई – भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी …

Read More »

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णयः स्मॉल सेव्हिंगज् व्याज दरात उद्यापासून वाढ वर्षभरासाठी बचत खात्यात पैसे ठेवल्यास ६.९ टक्के मिळणार व्याज

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज एक परिपत्रक काढत बचत खात्यां अर्थात सेव्हिंगज् खात्यांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेंवीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. विशेष म्हणजे हे नवे व्याज दर उद्या १ जुलै अर्थात उद्यापासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केल्यानुसार बचत ठेवींवर ४.० …

Read More »