Breaking News

सकाळी सकाळी चालत्या लोकलमध्ये २० वर्षीय तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न आरपीएफ पोलिसांकडून आरोपीला अटक

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिट वाजता ही …

Read More »

म्हाडाला द्यायचे होते ९८ हजार चौ. फु. जागेचे बांधकामः पण मिळाले ४० हजार चौ.फुट चटई निर्देशांक घोटाळ्यात म्हाडाला १४५ कोटी रूपयांचा विकासकाकडून चुना

दादर येथील लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात राज्य सरकार आणि पर्यावरण खात्याने निर्धारीत केलेल्या सरप्लस अर्थात अतिरिक्त जागेसह चटई निर्देशांक क्षेत्रफळाचे जवळपास ९८ हजार चौ.फुटाचे बांधकाम देणे अपेक्षित असताना विकासकाने अवघ्या ४० हजार चौ.फुटाचे बांधकाम म्हाडाला हस्तांतरीत केल्याने आणि त्याकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल १४५ कोटी …

Read More »

..अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले… मुख्यमंत्र्यांकडून युवकाला तातडीची मदत

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता …

Read More »

जयंत पाटील यांनी केला या तीन लोकसभा मतदारसंघांवर दावा

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, …

Read More »

आषाढी वारीमध्ये ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

“आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, असं काय घडलंय की १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आलीय… सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज काय

ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात ?

भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून टिफीन बैठका घेण्याची …

Read More »

समान नागरी कायदाः मोदी सरकारने मागविल्या हरकती व सूचना

२०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्षे अजेंड्यावर असलेले विषय एक एक करून मार्गी लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार या दुसऱ्या टर्ममध्ये तीन तलाक, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जाचे ३७० वे कलम काढून टाकणे, राम मंदीराची उभारणी करणे आदी आश्वासनांची पूर्तता केल्यानंतर नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

अजित पवार यांचा खोचक टोला, आजच्या जाहिरातीतून…. नऊ मंत्र्यांची माळ… मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती करुन आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न

मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती केली, परंतु आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? असा सवाल जनतेच्या मनात असून आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे. त्यात वरील भागात भाजपा – शिवसेनेचा उल्लेख केला तर मग भाजपाचे मंत्री का नाहीत असा सवाल करतानाच ज्या नऊ मंत्र्यांची …

Read More »

राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ आदेश

राज्यातील विजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित यंत्रणांनी राज्यात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या १०५ …

Read More »