ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिअरबायोसेप नावाच्या या काँमेडी शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरविलेला रणवीर अलाहाबादी याने आई-वडीलांवरून बीभत्स विनोद केला होता. त्यावरून त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई झाली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला फटकार खावी लागली होती. त्यात आणखी एकाची भर पडली असून ही दुसरा-तिसरा किंवा तिसरी कोणी नसून स्वाती सचदेवाची आहे. स्टँड अप कॉमेडीयन स्वाती सचदेवाने तिच्या परफार्मन्सवेळी आई-वडीलांवरून बीभत्स विनोद केला आहे. त्यावरून आता तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
स्टॅण्ड अप कॉमेडियन स्वाती सचदेवाने तिच्या शोमध्ये आईवर विनोद केला आहे. आईला वायब्रेटर (सेक्स टॉय) सापडल्यावर काय होते यावर स्वाती सचदेवाने आक्षेपार्ह विनोद सादर केला आहे. या विनोदाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर तिच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्टॅण्ड अप कॉमेडियन आता मर्यादा ओलांडत असून पालकांवरच अभद्र विनोद करत आहेत अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रणवीर अलाहाबादीयाने त्यांच्या शो मध्ये आलेल्या पार्टीसिप्टना थेट प्रश्न करत तू तुझ्या पालकांना शरिरसंबध करताना रोज पाहशील का किंवा त्यांच्यात सामील होऊन त्यांना तसे करण्यापासून रोखशील असा बीभत्स प्रश्न केला विचारला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणवीर अलाहाबादीया विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच सोशल मिडीयावर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता.
या व्हिडिओवरून रणवीर अलाहाबादीयाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. तसेच त्याच्या प्रकरणात समय रैनालाही उत्तर द्यावे लागले होते. या दोघानंतर स्वाती सचदेवा चा व्हिडिओ आता चर्चेत आला आहे. त्या व्हिडिओत स्वाती सचदेवा व्हायब्रेटर (सेक्स टॉय) हा जावई असल्याचे सांगत पलंगावर फेकल्यानंतर तो चालू झाल्यानंतर आता त्याचा वापर करावा लागणार असल्याचे तीने तिच्या आईला सांगितल्याचेही विनोदा दरम्यान सांगितले. तिचा हा विनोद न रूचल्याने एका एक्स युजरने स्वाती सचदेवा ही निर्लज्ज मुलगी आहे. तिने विनोदाच्या नावाखाली अश्लिलता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. पैशाच्या हव्यासा पोटी स्टँड अप कॉमेडियन त्यांच्या पालकांनाही सोडत नाहीत असे प्रतिक्रिया एक्सवर व्यक्त केली.
कॉमेडी के नाम पर मम्मी-पापा तक को नहीं छोड़ा जा रहा है।
रणवीर इलाहबादिया और समय रैना के बाद अब स्वाति सचदेवा !
घटिया… बेहद घटिया…! #swatisachdeva pic.twitter.com/HvDjvVlPdY
— ReporteR Sahab (@ReporterSahab) March 29, 2025
