Marathi e-Batmya

सई ताम्हणकर हिच्या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अभिनेत्री सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.सईनं ‘मिमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटाउन चात्यांना भेटीला येत असते.

मराठीतली आघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.इंस्टाग्रामवर सई नेहमी सुंदर फोटो अपलोड करत असते. यावर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कॉमेंट्स करत असतात.

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रावर काही फोटो शेअर केले आहेत. मात्र अभिनेत्रीचे हे फोटो पाहिल्यानंतर काहींना तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिचा चांगलाच क्लास घेत आहेत. नेटकऱ्यांनी केलेल्या टीकेची आता चांगलीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

एका युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, ही पण उर्फी जावेदसारखे कपडे घालायला लागली का? तर अजून एकाने लिहीलंय, मराठी संस्कृती पुढे नेणार, तर अजून एकजण म्हणाला, अगो पोरी.. ह्या काय घातलास….जरा बाई वानी वाग… तर अजून एकाने लिहीलंय, तेवढंच काय ते झाकल व देणं दाखवून लोकांना… अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत युजर्सने तिला ट्रोल केलं आहे.

Exit mobile version