Marathi e-Batmya

अभिनेता अल्लू अर्जूनला आधी अटक नंतर १४ दिवसांची पोलिस कोठडी

काही दिवसांपूर्वी पुष्पा-२ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३०० कोटीहून अधिक गल्ला जमवित नवा रेकॉर्ड बनविला. परंतु या चित्रपटाच्या तिकीट रांगेत चेंगरा चेंगरी झाल्याने एका महिलेला प्राणास मुकावे लागले. या महिलेच्या मृत्यबद्दल या चित्रपटाचा नायक अभिनेता अल्लू अर्जून याने शोक व्यक्त करत २५ लाख रूपयांचे अर्थसहाय्यही कुटुंबियांना दिले. मात्र तरीही या महिलेच्या मृत्यू अभिनेता अल्लू अर्जून यास जबाबदार धरत आंध्र प्रदेशमधील नामपल्लीच्या पोलिसांनी अभिनेत्ता अल्लू अर्जून यास आज त्यांच्या राहत्या घरून अटक केली. त्यानंतर अल्लू अर्जून यास न्य़ायालायत हजर करण्यात आले. त्यावेळी अल्लू अर्जून यास १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पुष्पा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला त्यावेळी त्यातील संवादांमुळे आणि अभिनेत्यांच्या कार्यशैली मुळे पुष्पा एक हा चित्रपट तेलगू बरोबरच हिंदी भाषेत तुफान चालला. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणाही चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी केली होती. त्यानुसार चित्रपटाचा सिक्वेल तयार झाल्यानंतर ४ डिसेंबरला हा चित्रपट तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला. ४ डिसेंबरला हा चित्रपट रिलीजच्या निमित्ताने झालेल्या इव्हेंटमध्ये चेंगरा चेंगरी झाली. या चेंगरा चेंगरा चेंगरीच्या घटनेत एक ३९ वर्षिय महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीररित्या जखमी झाली. त्यामुलावर अद्यापही रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जून आणि संध्या चित्रपट व्यवस्थापनच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जून यास त्यांच्या राहत्या घरून अटक केली. त्यानंतर नामपल्ली येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जून यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान न्यायालयाने सुनावलेल्या या कोठडीच्या विरोधात अभिनेता अल्लू अर्जून याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली.
चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी अभिनेता अल्लू अर्जूनने स्क्रिनिंगला जावू नये अस सांगण्यात आलं होते. मात्र तरीही अल्लू अर्जून याने या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचा आरोप सरकारी वकीलांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद करताना केला. सध्या या प्रकरणी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद सुरु आहे. या युक्तीवादानंतर उच्च न्यायालय का निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version