Breaking News

मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचे आवाहन, सिनेउद्योग नष्ट करू नका हेमा समितीच्या अहवालानंतर केले पहिल्यांदाच भाष्य

मल्याळम सिनेसृष्टीतील लैगिंक अत्याचाराच्या घटना आणि कलावंताच्याबाबत होत असलेला भेदभावाच्या अनुषंगाने हेमा समितीची स्थापना करण्यात आली. या हेमा समितीचा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला. त्यानंतर अभिनेते मोहनलाल यांनी अम्मा AMMA (मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत इतर १७ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर पहिल्याच याप्रकरणावर अभिनेते मोहनलाल यांनी आपले मौन सोडत मल्याळम सिनेउद्योग नष्ट करू नका नष्ट करू नका असे आवाहन केले.
अभिनेते मोहनलाल म्हणाले की, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्व लक्ष अम्मा AMMA वर केंद्रित करू नका. चौकशी सुरू आहे. कृपया उद्योग नष्ट करू नका,” असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांनी २७ ऑगस्ट रोजी असोसिएशनच्या प्रशासकीय मंडळाच्या काही सदस्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर नैतिक जबाबदारीचे कारण देत अम्मा संघटनेचे AMMA अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

अभिनेते मोहनलाल बोलताना म्हणाले की, आम्ही हेमा समितीच्या अहवालाचे स्वागत करतो. तो अहवाल जाहीर करणे हा सरकारचा योग्य निर्णय होता. अम्मा AMMA सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. हे प्रश्न प्रत्येकाला विचारले गेले पाहिजेत. हा एक अतिशय मेहनती उद्योग आहे. अनेक लोकांचा सहभाग यात आहे, पण प्रत्येकाला दोषी ठरवता येणार नाही, चौकशी सुरू असल्याचेही यावेळी सांगितले.

सर्व ‘समस्या’ तपासल्या जात असल्याची स्पष्ट करत अभिनेते मोहनलाल म्हणाले, आम्ही तपास प्रक्रियेत सहकार्य करू. आम्ही येथे फक्त गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी आलो आहोत. मला अशा कोणत्याही शक्ती गटाची माहिती नाही. मी त्याचा भाग नाही. मी हेमा समितीचा अहवाल वाचलेला नाही असेही यावेळी सांगितले.

मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप करणाऱ्या हेमा समितीच्या अहवालाने मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी त्यांना स्वतःला सामोरे जावे लागलेल्या छळ आणि शोषणाविषयी उघड केले आहे.
एका खाजगी प्रसारमाध्यमाशी बोलताना अभिनेते मोहनलाल म्हणाले की, आम्ही सर्वांनी आमची पदे (AMMA) का सोडली आहेत असे जर तुम्ही विचारले तर उत्तर असे आहे की संपूर्ण मल्याळम चित्रपट उद्योग जबाबदार आहे. अहवालात केवळ एकच नाही तर अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ते नेमके काय आहेत, माझ्यापेक्षा तुला चांगले माहीत आहे.

केवळ मोहनलालच नाही तर मल्याळम उद्योगाच्या संपूर्ण प्रशासकीय मंडळाने त्यांच्या पदांचा राजीनामा दिला. असोसिएशनच्या निवेदनात असे लिहिले आहे की, “आम्हाला आशा आहे की अम्मा AMMA कडे एक नवे नेतृत्व असेल जे असोसिएशनचे नूतनीकरण आणि मजबूत करण्यासाठी सक्षम असेल असा आशावादही यावेळी व्यक्त केला.

Check Also

अभिनेत्री “सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल” नांदा सौख्यभरे नोंदणी पध्दतीने विवाह सोहळा संपन्न

मागील काही दिवसांपासून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *