Marathi e-Batmya

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना कन्यारत्न

Ranveer Singh threat case

रविवारी, ८ सप्टेंबर रोजी एका मुलीचे पालक बनलेले बॉलिवूड कलाकार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. या जोडप्याने संयुक्त पोस्टमध्ये लिहिले की, “स्वागत आहे मुलीचे (welcom beby girl.) ८-९-२०२४. दीपिका आणि रणवीर.”

रणबीर आणि दीपिका या जोडप्याने पोस्ट शेअर करताच,बॉलीवूड मधील सेलिब्रेटी आलिया भट्ट, तिची बहीण शाहीन भट्ट, रुबिना दिलीक, अमृता खानविलकर, अथिया शेट्टी, मलायका अरोरा आणि इतर अनेकांनी दीपिका आणि रणवीरच्या पोस्टवर कमेंट कर अभिनंदन केले.
दीपिका आणि रणवीरने यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यांनी इन्स्टाग्रामवर “सप्टेंबर २०२४” अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लहान मुलांचे कपडे, लहान मुलांचे शूज आणि फुग्याचे गोंडस आकृतिबंध आहेत. तिच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान, दीपिका व्यावसायिक आघाडीवर सक्रिय राहिली आणि अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली.

रुग्णालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी, दीपिकाने रणवीरसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आणि देवाचे आशीर्वाद मागितले.

याआधीही दीपिकाच्या प्रेग्नेंसीपूर्वीच रणवीरने मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

द बिग पिक्चर या त्याच्या टीव्ही शोमध्ये बोलताना, अभिनेता रणवीर सिंग म्हणाला होता, “जैसा की आप लोग जाते हैं मेरी शादी हो गई है और अब २-३ साल में बच्चे भी होंगे. भाई साब, आपकी भाभी इतनी क्यूट बेबी थी ना. मैं तो. रोज उसकी बेबी फोटो देखता हूँ, कहता हूँ एक ऐसी दे मुझे बस मेरी लाइफ सेट हो जाये (तुम्हाला माहित आहे की, मी विवाहित आहे आणि येत्या दोन-तीन वर्षात मला मुलंही होऊ शकतात. तुमची वहिनी लहान असताना अशी होती. तिच्या बालपणाचे गोंडस बाळ असलेले फोटो मी रोज फोटो पाहतो आणि तिला सांगतो की मला असे बाळ दे, माझे आयुष्य सेट होईल).

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रेमाची सुरुवात २०१२ पासून झाली. त्यांनी १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले. करण जोहरने होस्ट केलेल्या कॉफ़ी विथ करण या लोकप्रिय टॉक शोच्या आठव्या सीझनमध्ये, या जोडप्याने पाच वर्षांत पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला. या एपिसोडदरम्यान रणवीरने दीपिकाला २०१५ मध्ये मालदीवमध्ये प्रपोज केल्याचेही सांगितले होते.

Exit mobile version