Breaking News

स्वानंदीने घेतली स्पृहाची जागा ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकामध्ये उमेश कामतसोबत दिसणार!

मुंबई : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वीच आम्ही एक बातमी दिली होती. त्यात स्पृहा जोशी ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातून बाहेर पडल्याचं म्हटलं होतं. पहिल्या प्रयोगापासून हे नाटक चांगलंच गाजतंय. ठिकठिकाणाहून प्रयोगाची मागणी वाढत आहे. पूर्वी केलेल्या काही कमिटमेंट्समुळे स्पृहाला नाटकाच्या प्रयोगांसाठी धावपळ करणं शक्य होत नसल्याने स्पृहाने ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ला रामराम ठोकल्याचं सांगण्यात आलं होतं, पण तिची जागा कोणती अभिनेत्री घेणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आता स्पृहाच्या जागी स्वानंदी टिकेकर नाट्यरसिकांना ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ म्हणणार आहे.

स्वानंदी ही शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर व अभिनेते उदय टिकेकर यांची मुलगी. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातून घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने यापूर्वीच स्वतःचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. याशिवाय सुमित राघवनसोबत ‘१०३’ या नाटकाद्वारे तिने रंगभूमीदेखील गाजवली असल्यामुळे स्वानंदी नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाद्वारे ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ ठेवण्यास नक्कीच यश मिळवेल अशी आशा आहे.

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातील प्रणोतीची जागा स्वानंदीने घेतली आहे. विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या २७५ व्या प्रयोगानंतर उमेश-स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे. चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील एक असणाऱ्या या नाटकातील नव्या प्रणोतीबद्दल बोलताना स्पृहाने अशी माहिती दिली कि, या नाटकाचा आज झालेला २७५ वा प्रयोग माझा शेवटचा प्रयोग असून, यापुढे स्वानंदी टिकेकर माझी भूमिका करताना तुम्हाला दिसेल. माझ्या काही प्रोफेशनल कमिंट्समेंटमुळे मला हे नाटक सोडावं लागतंय. पण, हे नाटक आजच्या काळाच महत्वाचं नाटक आहे. या नाटकाचा विषय खूप महत्वाचा असल्यामुळे, माझ्या नसण्याने एक चांगला विषय बंद होणं योग्य नाही. त्यामुळे या नाटकाच्या पुढील प्रवासात माझ्या जागेवर स्वानंदी टिकेकर हा नवा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. माझ्या भूमिकेवर जसे भरभरून प्रेम केले अगदी तसेच प्रेम तुम्ही स्वानंदीवर देखील कराल अशी मी आशा करते.

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकातील या महत्वपूर्ण बदलाबद्दल सांगताना, स्पृहा एक मेहनती अभिनेत्री असून, तिच्यासोबतचा पार केलेला या नाटकाचा दीर्घ प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे उमेश म्हणाला. तसेच प्रणोतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या स्वानंदीबद्दल बोलताना, स्वानंदी हुशार आणि कुशल अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायला आपण खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे.

सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित, मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश-स्पृहाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला न्याय देण्याचे आव्हान स्वानंदीवर असणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वानंदी म्हणाली कि, प्रणोतीची भूमिका माझ्यासाठी खूप चेलेन्जिंग जरी असली तरी, नाटकाच्या संपूर्ण टीमकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे मला या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारचे दडपण आलं नाही. उलट मी या भूमिकेचा आनंदच अधिक लुटत आहे. या नाटकाची स्क्रिप्ट आणि पटकथेला योग्य न्याय देणं हेच माझं उद्दिष्ट असेल.

Check Also

आमिर खान आणि अमिताभ बच्चनने घेतले नवे लक्झरी घर किमान किंमत ९ कोटी

गतवर्षी लक्झरी रिअल इस्टेट डीलच्या विक्रमी संख्येनंतर, २०२४ मध्ये मुंबई प्रॉपर्टी मार्केटमध्ये सेलिब्रेटींकडून आकर्षित होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *