Breaking News
SHAMMI KAPOOR AND MUMTAJ

करिअरमुळे भंगले कपूर घराण्याचे सून होण्याचे स्वप्न, अभिनेत्री मुमताजची अधुरी प्रेम कहाणी आयुष्यात सर्व काही सर्वोत्कृष्ट हवे असे म्हणणारी मुमताज १९७४ मध्ये युगांडाचा उद्योगपती मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पण, इथेही तिच्या नशिबी प्रेम नव्हते.

वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांत तिने लहान भूमिका केल्या. पण, परिणाम असा झाला बी ग्रेडची अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एकदा तिने डोळे बंद केले खूप विचार केला. सगळे देवाच्या हातात आहे असे म्हणत ती पुन्हा कामाला लागली. चित्रपटसृष्टीत करिअरची जी सुरुवात झाली तशी होणे चुकीचे होते याची तिला जाणीव झाली. अभिनेत्यांनी नकार दिला म्हणून त्यांना तिने दोष दिला नाही. बी ग्रेडचा दर्जा ही स्वत:ची ओळख पुसण्यासाठी तिने अभिनेता दारा सिंग यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले. ‘भीमसेन’, ‘टार्जन कम्स टू दिल्ली’, ‘टार्जन अ‍ॅण्ड किंग काँग’ अशा चित्रपटांत एकत्र काम केले. मात्र, त्यानंतरही तिला दर्जेदार चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या नाहीत. परंतु, प्रत्येकाला यशापर्यंत घेऊन जाणारी पायरी हवी असते. ती पायरी तिला मिळाली. दिलीप कुमार यांच्यासोबत ‘राम और श्याम’ चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. शम्मी कपूर, जितेंद्र, राजेश खन्ना, सुनील दत्त, धर्मेद्र, देव आनंद अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांची ती मुख्य नायिका होती. नाउमेद न होता यशाची पायरी चढणारी ती अभिनेत्री होती मुमताज…

मुमताजचा जन्म ३१ जुलै १९४७ रोजी अब्दुल समीद अस्करी आणि सरदार बेगम हबीब आगा उर्फ नाज यांच्या पोटी झाला. ते दोघेही मूळचे इराणी असले तरी मुंबईत स्थायिक झाले होते. आई नाज या देखील चित्रपटांमध्ये काम करत होत्या. पण, कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यावेळी मुमताजने ज्युनियर आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार दिला. वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून मुमताज हिने संस्कार (१९५२) मध्ये काम केले. व्ही. शांताराम यांच्या स्त्री आणि सेहरामध्ये ती दिसली. पण, तिची भूमिका नगण्य होती.

सर्वाधिक मानधन घेणारी हिंदी अभिनेत्री

मुमताज यांची मोठी पहिली भूमिका ओ.पी. रल्हान यांच्या गेहरा दाग मध्ये नायकाच्या बहिणीची होती. त्यानंतर मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांनी बनवलेल्या पठाणमध्ये मुमताजला मुख्य भूमिका मिळाली. पण, हा चित्रपट अपूर्णच राहिला. मुमताज हिने छोट्या भूमिकांपासून सुरुवात केली. दारा सिंग यांच्यासोबत तिने बी ग्रेड चित्रपट केले. १९६४ ते ६८ या काळात त्यांनी एकत्र केलेल्या १६ पैकी १० चित्रपट हिट झाले होते. पण, तिचे प्रयत्न सुरू होते ते स्टारडम सिनेमासाठी. १९६९ मध्ये तिला ‘दो रास्ते’ मध्ये राजेश खन्ना यांची नायिका म्हणून भूमिका मिळाली. मात्र, त्याआधी ‘आराधना’ रिलीज झाला. राजेश खन्ना सुपरस्टार बनले. त्यांचे पुढचे ‘दो रास्ते’ आणि बंधन या दोन्ही चित्रपटात मुमताज हीच त्यांची नायिका होती. या २ चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर मुमताज १९७० ते १९७६ पर्यंत सर्वाधिक मानधन घेणारी हिंदी अभिनेत्री बनली. तिने तिच्या प्रत्येक चित्रपटातील आकर्षक आणि प्रेरणादायी अभिनयाने सर्वांचे मन जिंकले.

प्रेमप्रकरणाचा शेवट झाला

शम्मी कपूर आणि मुमताज ही जोडी त्याकाळी गाजत होती. ही जोडी लवकरच विवाह बंधनात अडकणार होती. त्याच्या अफेअरही खूप चर्चेत होते. त्यावेळी मुमताज यांचे वय अवघे १७ वर्ष होते. शम्मी कपूर यांची मुमताज हिने करिअर सोडावे अशी इच्छा होती. त्या काळात कपूर कुटुंबातील महिला चित्रपटात काम करत नव्हत्या. त्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबाची इच्छा जपायची होती. पण, त्याचे मुमताजवर खूप प्रेम होते. दुसरीकडे मुंटाज हिल कुटुंबाचीही काळजी घ्यावी लागत होती. स्ट्रगलर म्हणूनही दरमहा आठ लाख रुपये कमवत होती. तिच्या काळातील सर्वात कमाई करणारी अभिनेत्री होती. त्यामुळे तिने करिअर सोडण्यास नकार दिला आणि या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला.

अभिनयातून ब्रेक घेतला

लहानपणी एकदा मुमताज हिच्या आईने ‘कोणाशी लग्न करायचे आहे’ असे विचारले. तेव्हा तिने मला इराणच्या शहेनशहाशी लग्न करायचे आहे असे सांगितले होते. आयुष्यात सर्व काही सर्वोत्कृष्ट हवे असे म्हणणारी मुमताज 1974 मध्ये युगांडाचा उद्योगपती मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला. पण, इथेही तिच्या नशिबी प्रेम नव्हतेच. तिच्या पतीचे आणखी एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते. एका मुलाखतीदरम्यान मुमताज हिने याचा खुलासा केला. जेव्हा तुम्ही दुखात असता अशावेळी कोणी गुलाब घेऊन येतो. त्यावेळी तुम्ही थोडे वाहून जाता. पण, त्यात गंभीर असे काहीच नव्हते. पुरुषांमध्ये गुपचूप अफेअर असणे सामान्य गोष्ट आहे. माझ्या पतीचे एकच होते. तरीही मी पतीचा आदर करते. कारण, त्याने स्वतःच त्याच्या अफेअरबद्दल सांगितले होते. तो एक तात्पुरता टप्पा होता आणि लवकरच संपला. मी भाग्यवान आहे की माझा नवरा अजूनही माझ्यावर खूप प्रेम करतो’, असे त्यांनी म्हटले होते.

Check Also

अभिनेत्री “सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल” नांदा सौख्यभरे नोंदणी पध्दतीने विवाह सोहळा संपन्न

मागील काही दिवसांपासून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *