Marathi e-Batmya

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गौतम अदानी, आनंद महिद्रा यांच्यासह या सेलिब्रेटींची श्रध्दाजंली

मराठी ई-बातम्या टीम

गेली जवळपास चार दशकाहून हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेरसिकांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून ट्विटरवरून श्रध्दांजली वाहण्यात आली.

महिंद्रा अॅड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, प्रसिध्द संगीतकार ए.आर. रेहमान  यांच्यासह उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे यांच्यासह काही अभिनेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहीली. मात्र या ट्विटमध्ये बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन, बॉलिवूड किंग शाहरूख खान यांच्या ट्विटरवरून कोणतेही श्रध्दांजलीचे ट्विट दिसले नाही.

 

Exit mobile version