Marathi e-Batmya

नसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी…

मुंबई : प्रतिनिधी

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपण या विषयावर का बोलत नाही? असा सवाल अमेरिकन जगद्विख्यात गायिका रेहान्ना हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय कलावंताना विचारला. मात्र अनेक बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रटींनी एकसारखे ट्विट करत युनिटी फॉर ऑलचा हॅशटॅग चालविला. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी बॉलीवूडवासियांना कानटोचणी देत अरे अजून किती तुम्ही कमावाल, तुमच्या सात पिढ्या बसून खातील इतके कमावले. आता काय गमावणार आहात असा उपरोधित सवालही ही बॉलीवूडवाल्यांना केला.

यासंदर्भात नसीरूद्दीन शाह यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या मुलाखतीत त्यांनी वरील कानटोचणी बॉलीवूडवाल्यांना दिली.

 

 

 

Exit mobile version