Marathi e-Batmya

‘बेशरम रंग’च्या वादावर प्रकाश राज म्हणाले, मग बलात्कारी स्वामी कसे चालतात?

शाहरूख खान आणि दिपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याने सध्या चांगलाच धुमाकुळ घातलेला आहे. या गाण्यात दिपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने काही लोकांकडून त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. तर अभिनेते प्रकाश राज यांनी याचे समर्थन करत भगवा परिधान केलेले बलात्कारी स्वामी कसे चालतात असा सवाल करीत शाहरूख-दिपिका पदुकोन यांचे समर्थनही केले.

हिंदी चित्रपट अभिनेते सिंघम फेम अभिनेते प्रकाश राज यांनी तर भगवे वस्त्र परिधान केलेले बलात्कारी स्वामी कसे चालतात असा सवाल करीत या गाण्याचे समर्थन करून या गाण्याला विरोध करणाऱ्यांवर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या वादाला आता नवे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पठाण चित्रपटातील ‘ बेशरम रंग ‘ या गाण्याचे सादरीकरण करताना अभिनेत्री दिपिकाने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केलेली आहे. यावर काही लोकांनी विशेषता हिंदुत्ववादी लोकांनी यावर आक्षेप घेतला आहे. असे असताना काही लोक याचे समर्थन करताना दिसत आहेत. सिंघम फेम प्रकाश राज यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून काही प्रश्न ट्विटव्दारे उपस्थित केले.

प्रकाश राज म्हणतात, ‘ हॅशटॅग बेशरम ‘ भगवा वस्त्र परिधान केलेले बलात्कारी स्वामी पुरुषाचा सन्मान करतात, भगवी कपडे घालून आमदार द्वेषपूर्ण समाजात तेढ निर्माण करणारी भाषणं करतात, दलाली करतात, भगवे वस्त्र जय श्रीराम, हरे राम हरे राम कृष्ण असे लिहिलेली भगवे वस्त्र परिधान केलेले स्वामी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करतात तेव्हा तुम्हाला काही गैर वाटत नाही, तो भगवा गैर वाटत नाही मात्र सिनेमातील भगव्या रंगाचा ड्रेस परीधान केलेला गैर कसा काय वाटतो असा सवाल प्रकाश राज यांनी उपस्थित केला.

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ पठाण ‘ सिनेमा नव्या वर्षात २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. अयोध्या येथील महंत राजू दास यांनी  ‘पठाण’ या सिनेमावर बहिष्कार टाकावा अशी मागणी केली. इतकंच नव्हे तर, पठाण सिनेमा ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल ते थिएटर जाळून टाकण्याचंही आवाहन करीत शाहरुख खान सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप महंत राजू दास यांनी केला. यावर सुद्धा अभिनेते प्रकाश राज यांनी आक्षेप घेतला आहे.

Exit mobile version