Breaking News

अॅक्सिस बँकेचा म्युच्युअल फंड बाजारात निफ्टी बाजारात अॅक्सिसचा फंड

नागरिकांचे वाढते उत्पन्न, शहरीकरण आणि वाढता मध्यमवर्ग यामुळे भारताच्या आर्थिक परिदृश्यात जलद गतीने परिवर्तन होत आहे. भारताच्या वाढत्या उपभोग क्षेत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी आणि देशातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याची एक धोरणात्मक संधी गुंतवणूकदारांना देण्यासाठी, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंडपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडाने ॲक्सिस कंझम्पशन फंड सुरू करण्याची घोषणा केली.

निफ्टी इंडिया कंझम्पशन टीआरआय हा बेंचमार्क असलेल्या या नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ या काळात खुली असणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन हितेश दास, श्रेयश देवलकर आणि कृष्णा नारायण (ओव्हरसीज सिक्युरिटीजसाठी) हे करणार आहेत. या थिमॅटिक गुंतवणुकीच्या संधीचा फायदा घेण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

भारतात वस्तू व सेवा यांना मोठीच मागणी असल्याने येथे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होते. क्रयशक्तीची क्षमता असलेली विशिष्ट लोकसंख्या, त्यांची वाढती क्रयशक्ती आणि शहरीकरण या घटकांमुळे त्यास पाठबळ मिळते. तरुण आणि महत्त्वाकांक्षी अशी मोठी लोकसंख्या भारतात आहे. साहजिकच येत्या काही वर्षांत भारतातील ग्राहकांच्या खर्चात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे गृहीत धरून ॲक्सिस कंझम्पशन फंडाने एफएमसीजी, वाहन उद्योग, दूरसंचार, आरोग्यसेवा, बांधकाम आणि इतर काही उपभोग-चालित क्षेत्रांचा समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला आहे.

“भारतात विकसित होणारी उपभोगाची पद्धती हा भारताच्या विकासाच्या मार्गाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आपल्या लोकसंख्येच्या आकांक्षा ज्या प्रमाणात वाढत आहेत आणि तिची खर्च करण्याची शक्ती वाढत आहे, त्या प्रमाणात कंपन्याही शाश्वत पद्धतीने वाढण्यासाठी सज्ज होत आहेत,” असे निरीक्षण ‘ॲक्सिस एएमसीचे’ मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता यांनी मांडले.

आशिष गुप्ता पुढे म्हणाले, “या वाढीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी ॲक्सिस कंझम्पशन फंड गुंतवणूकदारांना देतो आणि त्या अनुषंगाने या गतिमान वाढीचा लाभ घेणारा एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. हा फंड केवळ सध्याच्या उपभोगाचा कल प्रतिबिंबित करत नाही, तर भविष्यातील वाढीच्या घटकांचाही अंदाज बांधतो. गुंतवणूकदारांना भारतातील आर्थिक परिवर्तनाचे फायदे मिळवून देण्यासाठी हा फंड काम करतो. हा थिमॅटिक दृष्टिकोन आपल्या देशाच्या प्रगतीच्या मूलभूत घटकांशी निगडीत आहे. गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी यातून एक अद्वितीय मार्ग मिळतो.”
ॲक्सिस कंझम्पशन फंडाविषयीः
भारतातील गतिमान स्वरुपाच्या उपभोग क्षेत्राचे भांडवल करण्यासाठी खास बनविण्यात आलेला ‘ॲक्सिस कंझम्पशन फंड’ हा गुंतवणूकदारांना अशा उद्योगांमध्ये संधी देतो, जे उद्योग भारतातील ग्राहकांच्या वर्तनात चालू असलेल्या संरचनात्मक व सांस्कृतिक बदलांचा लाभ घेऊ शकतात. गुंतवणुकीच्या गुणवत्ता-केंद्रित शैलीने हा फंड बॉटम-अप दृष्टिकोनाचा अवलंब करेल आणि ग्राहकांकडून उपभोग वाढत असल्याच्या कलांचा वापर करून घेईल.
केवळ एफएमसीजी क्षेत्रावर अवलंबून न राहता त्या पलिकडील क्षेत्रांवर, उदा. ग्राहक विवेकाधीन, रिटेल विक्री, वाहन, बांधकाम या क्षेत्रांवर, या फंडाचा भर असेल. भारतातील मोठी उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेच्या वाढीची क्षमता उपयोगात आणण्याच्या दृष्टीने ‘ॲक्सिस कंझम्पशन फंड’ एक वैविध्यपूर्ण गुंतवणूक दृष्टीकोन ऑफर करेल. भारतातील वाढत्या मध्यमवर्गाच्या आणि वाढत्या ग्राहक खर्चाच्या वाढीच्या कथेत सहभागी होऊन गुंतवणूकदार या फंडाच्या तज्ज्ञ व्यवस्थापनाचा आणि क्षेत्र-विशिष्ट अंतर्दृष्टींचा फायदा घेऊ शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत