Breaking News

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, टोमॅटो, कांदा, बटाटा पुन्हा जेवणात दिसणार महागाई आणि किंमती कमी होण्याची शक्यता

दक्षिणेकडील राज्यांतून पुरवठा सुधारल्याने टोमॅटोची किरकोळ किंमत राष्ट्रीय राजधानीत ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढलेली असून, येत्या आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे वाढलेल्या बटाटा आणि कांद्याच्या किमतीही लवकरच स्थिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जेवणातून गायब झालेला टोमॅटो, बटाटा आणि कांदा पुन्हा दिसायला लागले अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये टोमॅटो, बटाटा आणि कांद्याचे किंमतीत वाढ होत आहे. परंतु या आठवठ्यात अति उष्णतेनंतर अतिवृष्टी झाल्याने अनेक भागातून होणारा पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे या भाजी पाल्याच्या किंमती वाढल्याचे सांगण्यात येत असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १२ जुलै रोजी दिल्लीत किरकोळ टोमॅटोचा भाव ७५ रुपये/किलो होता, जो मागील वर्षीच्या कालावधीत १५० रुपये/किलो होता. मुंबईत त्याची किंमत ८३ रुपये/किलो होती, तर कोलकात्यात ती ८० रुपये/किलो होती.

१२ जुलै रोजी टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत ६५.२१ रुपये/किलो होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ५३.३६ रुपये/किलो होती.

सध्या दिल्लीला टोमॅटोचा पुरवठा प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील संकरित टोमॅटो राष्ट्रीय राजधानीत पोहोचल्याने भाव कमी होतील,” अशी आशा अधिकाऱ्याने व्यक्त केली.

अनुदानित टोमॅटोची विक्री पुन्हा सुरू करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, हा उपाय गेल्या वर्षी जेव्हा किंमत ११० रुपये प्रति किलोपेक्षा जास्त होती तेव्हा लागू करण्यात आली होती.

अधिकाऱ्याने नमूद केले की, देशात २८३ लाख टन बटाटे साठवले गेले आहेत, जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन असूनही देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे.

महाराष्ट्रातील घाऊक बाजारात कांद्याचे भाव कमी झाले असून, सप्टेंबरमध्ये नवीन पीक आल्याने कांद्याचे भाव आणखी घसरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मुसळधार पावसामुळे टोमॅटो, बटाटे, कांदे आणि हिरव्या भाज्यांचा पुरवठा मुख्य किरकोळ बाजारात विस्कळीत झाला आहे, ज्यामुळे महानगरांमध्ये किमती वाढल्या आहेत.

दिल्लीत १२ जुलै रोजी किरकोळ बटाट्याचा भाव ४० रुपये/किलो होता, गेल्या वर्षी २५ रुपये/किलो होता, तर कांद्याचा भाव ३३ रुपये/किलोवरून ५७ रुपये/किलो झाला. प्रतिकूल हवामानामुळे आणखी व्यत्यय निर्माण झाला नाही तर येत्या आठवड्यात किंमत स्थिर होण्याबाबत सरकार आशावादी आहे.

१३ जुलै रोजी महाराष्ट्रात किमती ७२.४७ रुपये/किलो होत्या, तर पश्चिम बंगालमध्ये किरकोळ किंमत ७१.३५ रुपये/किलो होती, असे ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार माहिती पुढे आली आहे.

Check Also

महागाई आणखी कमी होण्याची शक्यताः बँक ऑफ बडोदा पालेभाज्यानंतर खाद्यपदार्थांच्या किंमतीतही घट होण्याची शक्यता

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई ऑगस्टमध्ये ३.२% आणि ४% च्या दरम्यान कमी होण्याची अपेक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *