Marathi e-Batmya

तीन वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड

भारतातील डिजिटल क्रांतीमुळे पुढील काही वर्षांत १ अब्ज यूपीआय व्यवहार होण्याची शक्यता आहे. सध्या, जगातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी ४६% प्रमाणासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास येत आहे. भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील व्यवसायांसाठी डिजिटल पेमेंटचा लाभ घेणे हे एक अजिबात चुकवू नये, असे धोरण आहे.

मात्र, डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे. केवळ गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन घोटाळ्यांमुळे १.२५ लाख कोटी रु.चा एकूण तोटा झाला आहे. या गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने व्यक्ती आणि व्यवसायांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध समित्या स्थापन केल्या आहेत आणि या धोक्यांचा सामना करण्यासाठी वित्तीय क्षेत्र अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहे.

ऑनलाइन फसवणुकीपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यात तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि व्यवसायांना देशाच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्यास सक्षम करते.

कॅशफ्री पेमेंट्सचे सीईओ आणि सहसंस्थापक आकाश सिन्हा म्हणाले, “आजच्या डिजिटल परिक्षेत्रामध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि फसव्या व्यवहारांपासून सावध राहणे हे व्यवसायांसाठी आर्थिक नुकसान टाळण्याकरिता आणि आपल्या नावलौकिकाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एआय आणि एमएल अल्गोरिदम वापरणाऱ्या टेक्नॉलॉजी प्रणित नवकल्पनांचा लाभ घेतला, तर फ्रॉडविरुद्ध संरक्षण मिळविणे लक्षणीय पद्धतीने वाढू शकते. हे प्रगत उपाय भारतातील ऑनलाइन व्यवहारांसाठी सुरक्षा चौकटीमध्ये बदल करत असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना अतुलनीय संरक्षण आणि मनःशांती मिळते.”

आज फ्रॉडसंबंधित नुकसानीपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सुरक्षित पेमेंट उपाय आवश्यक आहेत.

“अनेक व्यवसाय एक तर फ्रॉड आणि रिस्क डिटेक्शन साधनांचे महत्त्व दुर्लक्षित करतात किंवा रिअल-टाइममध्ये फसवणुकीचे व्यवहार थांबवू शकत नाहीत, अशा साधनांचा वापर करतात. जोडीला प्रभावी फ्रॉडविरोधी उपाय तयार करण्यासाठी अनेकदा विशेष प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. तथापि, ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांबद्दल केव्हा सुरक्षित वाटतं, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. तेव्हा ते पुन्हा-पुन्हा खरेदी करतात आणि इतरांना व्यवसायाची शिफारस करतात, त्यामुळे विकास होतो,” असे आकाश म्हणाले.

तंत्रज्ञानावर आधारित पेमेंट सोल्युशन्समध्ये संपूर्ण रिस्क मॅनेजमेंट क्षमता असते. डेटा ब्रीचेसची शक्यता कमी करत एन्क्रिप्शन आणि टोकनायझेशनसारखे डेटा सिक्युरिटी उपाय सर्व ग्राहक डेटा संरक्षण सुनिश्चित करतात, शिवाय मजबूत रिस्क मॅनेजमेंट प्रणाली कंपन्यांना नियामक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करू शकतात आणि त्यामुळे अतिरिक्त रिस्क कमी होते.

सिन्हा पुढे म्हणाले, “कॅशफ्री पेमेंट्समध्ये आम्ही व्यवसायांना सायबर क्राइमचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक रिस्क मॅनेजमेंट उपाय प्रदान करण्यासाठी व्यापक संशोधनाद्वारे ‘रिस्कशील्ड’ तयार केले आहे. उच्च चार्जबॅक्स आणि फ्रॉड यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन केलेले, ‘रिस्कशिल्ड’ आर्थिक सेवा, ई-कॉमर्स व प्रवास यांसह विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी आहे. ॲडव्हान्स्ड एआय आणि एमएल अल्गोरिदमचा वापर करून, रिस्कशिल्ड व्यवसायांना फसवणुकीचे प्रकार ४०% पर्यंत कमी करण्यास मदत करते.”

आधुनिक व्यावसायिक जगात कंपन्यांनी अत्याधुनिक फ्रॉड शोध प्रणाली, सुरक्षित पेमेंट गेटवे तंत्रज्ञान आणि व्यापक ग्राहक व्हेरिफीकेशन प्रक्रिया यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तरच त्या यशस्वी होऊ शकतात.

Exit mobile version