Marathi e-Batmya

अर्थसंकल्पीय लाईव्ह अपडेट

*विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांसाठी १ हजार ६८७ कोटी ७९ लक्ष रू. निधीची तरतूद

*अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी ९९४९. २२ कोटींची भरीव तरतूद

*अकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून विक्री केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस. ह्यासाठी ५ कोटी रू. निधीची तरतूद.

*नागपूरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी २० कोटी रू. निधीची तरतूद

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासाठी ४० कोटी रू. निधीची तरतूद.

*निसर्ग पर्यटन विकासासाठी अर्थात् इको टूरीझम कार्यक्रमासाठी १२० कोटी रू. निधीची तरतूद.

*बफर झोन क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेसाठी १०० कोटी रू. निधीची तरतूद.

*वन क्षेत्रात वनतळे व सीमेंट बंधा-यांचे बांधकाम करण्यासाठी ११ कोटी रू. निधीची तरतूद.

*वनांचे संरक्षण व संवर्धन ह्यासाठी राबविण्यात येणा-या संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमासाठी ५४ कोटी ६८ लक्ष रू. निधीची तरतूद.

*2018 च्या पावसाळ्यात राबविण्यात येणा-या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक निधीची तरतूद

*सागरी क्षेत्रातील विकास कामांचे नियमन व तटीय क्षेत्रांतील लोकांची पारंपारिक उपजीविका वाढविणे व क्षेत्र व्यवस्थापन ह्या प्रकल्पासाठी ९ कोटी ४० लक्ष रू. निधीची तरतूद.

*अकोला शहरातील मोरणा नदी स्वच्छता मोहीमेला मदतीचा हात देण्याचा निर्णय, राज्यातील जल स्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या योजनेसाठी २७ कोटी रू. निधीची तरतूद.

*कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील १६ जिल्ह्यांसाठी तसेच बिगर- आदिवासी‌ क्षेत्रांतील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र योजना सुरू करणार. ह्यासाठी २१ कोटी १९ लक्ष रू. निधीची तरतूद.

*संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही योजना राबविण्यासाठी २० कोटी रू. निधीची तरतूद

*हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रू. निधीची तरतूद

*सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये अंदाजे २० कोटी रू. किमतीचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करणार.

*माता व बाल मृत्युचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविण्यात येणा-या प्रधान मंत्री मातृवंदना योजनेसाठी ६५ कोटी रू. निधीची तरतूद

*महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानासाठी ५७६ कोटी ५ लक्ष रू. निधीची तरतूद.

*केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ९६४ कोटी रू. निधीची तरतूद.

*सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी ९०० कोटी रू. निधीची तरतूद

*स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील ८ शहरांसाठी १ हजार ३१६ कोटी रू. निधीची तरतूद

*नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा व मल:निस्सारण ह्यासाठी राबविण्यात येणा-या अमृत योजनेसाठी २ हजार ३१० कोटी रू. निधीची तरतूद

*कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडला अनुदान देण्याचा निर्णय. ह्यासाठी ५ कोटी रू. निधीची तरतूद.

*स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. १ हजार ५२६ कोटी निधीची तरतूद

*ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना राबविणार. ह्यासाठी ३३५ कोटी रू. निधीची तरतूद.

*समुद्र किना-यावर मच्छीमारी करणा-या मच्छीमार बोटींच्या सुरक्षेसाठी दोन अत्याधुनिक गस्ती नौका तैनात करणार

*पोलिस ठाणे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडल्या जाणार. ह्यासाठी १६५ कोटी ९२ लक्ष रू. निधीची तरतूद.

*पोलिस ठाण्यातील ई-गर्व्हनन्स योजनेसाठी ११४.९९ कोटींची तरतूद

*अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिस दलाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण ह्यासाठी १३ हजार ३६५ कोटी ३ लक्ष इतकी भरीव तरतूद

*अकृषिक विद्यापीठांसाठी आययुएमएस यंत्रणा बसविणार. त्यासाठी १८ कोटी रूपयांची तरतूद

*संत्रा प्रक्रिया उद्योगांतर्गत संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढविण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला ह्या तीन जिल्ह्यांत पंजाब राज्याप्रमाणे “सिट्रस इस्टेट” ही संकल्पना राबविणार. त्यासाठी १५ कोटी इतक्या रू. निधीची तरतूद

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात चक्रधर स्वामींच्या नावे केंद्र स्थापन करणार

*भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सांगली मार्डी, जि. उस्मानाबाद ह्यांच्या मार्फत केल्या जात असलेल्या कौशल्य विकासाच्या कामासाठी प्रत्येकी रू. २ कोटींचे अनुदान

* डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्यासह अन्य थोर महापुरूषाचे साहित्य वेब पोर्टलवर आणणार. त्यासाठी ४ कोटींची तरतूद

*मातीकला कारागीरांचा विकास व रोजगार निर्मितीसाठी संत गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला बोर्ड वर्धा येथे स्थापन करणार. ह्यासाठी १० कोटी रू. निधीची तरतूद

*विविध हस्तकला कारागिरांची क्षमतावृद्धी करून हस्तकलेचा विकास करण्याचा निर्णय. ह्यासाठी ४ कोटी २८ लक्ष रू. निधीची तरतूद

* व्ही.जे.एन.टी आणि ओबीसींच्या विकासासाठी१८७५.९७ कोटींची तरतूद

*काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने शाश्वत व पर्यावरण पूरक काथ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन ह्यासाठी १० कोटी रू. निधीची तरतूद

*न्यायालयीन इमारतींच्या बांधकामासाठी ७०० कोटी ६५ लक्ष रू. निधीची तरतूद

* विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र ह्या भागातील डी व डी+ उद्योगांना दिल्या जाणा-या वीज दरामध्ये सवलतीसाठी ९२६ कोटी ४६ लक्ष रू. निधी प्रस्तावित

*केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षार्थींच्या मानधनात २ हजार रूपयांवरून ४ हजार रूपये करणार

*सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ तास ऊर्जा देण्यासाठी ३७५ कोटींची तरतूद

*ऊर्जा स्त्रोताच्या विकासासाठी ७७४ कोटी ५३ लाख रूपयांची तरतूद

*ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी ७ हजार २३५ कोटी रूपयांची तरतूद तर प्रणाली सुधारण्यासाठी ३६५.५५ कोटींची तरतूद

*जल वाहतूकीच्या पायाऊीत सुविधांसाठी २२ कोटी ३९ लाख रूपयांची तरतूद

* नवीन एस.टी बसस्थानके उभारणीसाठी ४० कोटी

*एस.टी महामंडळाकडून नवी मालवाहतूक सेवा

* मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रूपये

* १४५ बाजार समित्या केंद्राच्या ई-नाम या वेब पोर्टलशी जोडणार

* मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी २ हजार २५५ कोटींची तरतूद

* कृषी क्षेत्रातील ९३ हजार वीज जोडण्यांसाठी ७५० कोटी रूपयांची तरतूद

*राज्यातील सुमारे ११ हजार ७०० किमी लांबीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वत: मंजुरी. तसेच २ हजार किलोमीटर लांबीचे अंदाजित रू. १६ हजार कोटी किमतीचे प्रकल्प

*मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रियेसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद

* नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेतून रस्ते सुधारणा व पूल बांधकामासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद

* मुंबईमध्ये एमएमआरडीएच्या सहभागातून २६६ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गाच्या आराखड्यास मंजूरी. ६७ लाख प्रवाशांना दररोज वातानुकूलित, सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार

* २०१८-१९ मध्ये सुमारे ७ हजार कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, त्यासाठी रु. २ हजार २५५ कोटी रुपयांची तरतूद

* नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेतून रस्ते सुधारणा व पूल बांधकामासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद

* मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ४ हजार ७९७ कोटी, तसेच वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूच्या रू. ७ हजार ५०२ कोटी किमतीच्या कामास मंजुरी

* समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एप्रिल २०१८ मध्ये सुरू होणार होणार असून हा महामार्ग ३० महिन्यांच्या अवधीत पूर्ण करण्याचे नियोजन

* मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यासाठी भरीव तरतूद

* थोर पुरुषांचे साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्यात येणार असून यासाठी ४ कोटीची तरतूद.

* रस्ते विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद

* बस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता ४० कोटींची तरतूद

* प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार, यासाठी ५० कोटींची तरतूद

* तरुण- तरुणींना कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने ६ कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार

* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत मालवाहतुकीची नवीन सेवा सुरू करणार

* ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद

* मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण. ह्यासाठी १६० कोटी एवढा निधी.

* जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधी

* कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद.

* जलसंपदा विभागासाठी ८ हजार २३३ कोटी १२ लक्ष रूपयाची तरतूद

* पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांकरिता ३ हजार ११५ कोटी २१ लक्ष निधीची तरतूद

* मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.

* शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.

* भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार २०२५ पर्यंत ५ हजार अब्ज डॉलर्स इतका करण्याचे लक्ष्य ठेवले असून यात महाराष्ट्राचा वाटा १ हजार अब्ज डॉलर्स असेल. हे लक्ष्य डोळ्यासमोर राज्य सरकार काम करणार.

* इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले असून २०१८- १९ मध्ये यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद

* प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद

* अरबी समुद्रातील शिवस्मारकाची निविदा अंतिम करण्यात आली असून ३६ महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.

* चांदापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला आश्वासन देतो की हा अर्थसंकल्प त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्याचा सरकारचा संकल्प आहे

* अर्थमंत्री म्हणून मी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून मला याचा अभिमान वाटतो.

 

Exit mobile version