Breaking News

अर्थविषयक

रिलायन्समध्ये नेतृत्वबदलाचे मुकेश अंबानीं यांचे संकेत अंबानी कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीकडे वर्ग होणार जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला. यावेळी …

Read More »

मुंबई ठरले महागडे शहर अहमदाबाद परवडणाऱ्या घरांसाठी अव्वलस्थानी

मराठी ई-बातम्या टीम अहमदाबाद शहर परवडणाऱ्या घरांसाठी अव्वल स्थानावर असून मुंबई हे महागडे शहर ठरले आहे. एकूण उत्पन्नाच्या प्रमाणात मोठा ईएमआय पडत असल्याने ते परवडत नसल्याचे नाईट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे. नाईट फ्रँकच्या परवडणाऱ्या घराच्या इंडेक्स २०२१ अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात परवडणाऱ्या घरांच्याबाबतीत भारतीय बाजारपेठ दशकातील सवोर्त्तम असल्याचे …

Read More »

१ जानेवारीपासून होणार ‘हे’ ६ बदल, जाणून घ्या… मुलांचे लसीकरण, एटीएममधून पैसे काढणे, कपडे-पादत्राणे खरेदी, ऑनलाईन बुकिंग यासह ६ गोष्टीं महागणार

मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष म्हणजे २०२२ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे आणि कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. १ जानेवारीपासून होणार्‍या ६ बदलांबद्दल आपण जाणून घेऊया. 1. ATM मधून पैसे काढणे महागणार आरबीआयने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. 2. कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होईल  कपडे आणि पादत्राणांवर १ जानेवारीपासून १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील GST ७ टक्क्याने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. 3. मुलांना कोरोनाची लस देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी १० वी वर्ग ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. 4. पोस्ट पेमेंट बँकेने वाढवले शुल्क इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना १ जानेवारीपासून रोख रक्कम काढणे आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवींसाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५० टक्के शुल्क भरावे लागेल जे किमान २५ रुपये असेल. मात्र, बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बेसिक सेव्हिंग अकाऊंट व्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यात १०,००० रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजार नंतर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा २५,००० रुपयांपर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.२५ टक्के शुल्क आकारले जाईल. 5. अॅमेझॉन प्राइमवर क्रिकेट सामने Amazon च्या OTT प्लॅटफॉर्मवर आता प्राइम व्हिडिओवर लाइव्ह क्रिकेट सामने पाहता येणार आहेत. Amazon प्राइम व्हिडिओ पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह थेट क्रिकेट स्ट्रीमिंग खेळात प्रवेश करत आहे. 6. कार महागार नवीन वर्षात तुम्हाला मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स १ जानेवारी पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्के वाढवणार आहे. Share on: WhatsApp

Read More »

सेन्सेक्स, निफ्टी वधारले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला

मराठी ई-बातम्या टीम देशातील शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९६ अंकांनी वधारून ५७४२० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२ अंकांनी वाढून १७०८६ वर बंद झाला. आरबीएल बँकेचा शेअर्स तब्बल १७.८३ टक्क्याने कोसळला. बँकेचे सीईओ सक्तीच्या रजेवर गेल्याने गुंतवणूकदारांनी आरबीएलच्या …

Read More »

भारतीयांसाठी खुषखबर, देशाची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकणार सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालात दावा

मराठी ई-बातम्या टीम कोरोनामधून जागतिक अर्थव्यवस्था आता सावरत असल्याचे दिसून येत आहे. वर्ष २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकून सहावे स्थान मिळवेल, असा दावा सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालात करण्यात आला आहे. जागतिक आर्थिक उत्पादन २०२२ मध्ये १०० ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. यासह भारत फ्रान्सला मागे टाकत …

Read More »

भारत-चीन वादाचा परिणाम नाहीचः उलट व्यापार विक्रमी पातळीवर दोन्ही देशांच्या व्यापारात ४६.४ टक्के वाढ झाली

मराठी ई-बातम्या टीम भारत आणि चीन यांच्यामधील व्यापार यावर्षी विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दोन्ही देशांमध्ये एकूण ८.५७ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. मागील पूर्ण वर्षाच्या तुलनेत यामध्ये ४६.४ टक्के वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ११ महिन्यांत भारताने चीनकडून ६.५९ …

Read More »

मागील आठवड्यात या कंपन्यांची बाजार भांडवलात आघाडी शेअर बाजारात टाटा, रिलायन्स बाजार भांडवलात सर्वात पुढे

मराठी ई-बातम्या टीम शेअर बाजारात मागील आठवड्यात देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १,०१,१४५.०९ कोटी रुपयांनी वाढले. या तेजीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आघाडीवर होते. मागील आठवड्यात देशातील शेअर बाजारात मोठा चढ-उतार पहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर …

Read More »

नवीन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स, वाहने, स्टीलच्या किंमती वाढणार ६ ते १० टक्क्याने वाढ होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्षाची सुरुवातच आता महागाईने होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, स्टीलच्या किंमती वाढणार आहेत. यासोबतच फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स उत्पादने आणि लॉजिस्टिकसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांनी या वर्षी उत्पादनांच्या किमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आता पुढील महिन्यापासून किंमती ६ ते १० …

Read More »

गुंतवणूकदारांनो, नव्या वर्षातील या नव्या आहेत गुंतवणूकीच्या संधी फेब्रुवारीपर्यंत येणार ४५ कंपन्यांचे आयपीओ

मराठी ई-बातम्या टीम या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने सुपरहिट ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंत ४५ कंपन्या त्यांचे आयपीओ आणण्याची शक्यता आहे. भांडवल उभारण्यासाठी आयपीओ आणत असलेल्या कंपन्यांमध्ये स्टार्टअपचाही समावेश असेल. वर्ष २०२२ मध्ये एलआयसीचा आयपीओ सर्वात मोठा असेल. मात्र, हा आयपीओ नक्की कधी येईल हे निश्चित झालेले नाही. मार्चपूर्वी आयपीओ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आतापर्यंत याचे …

Read More »

नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा लिलाव होणार ईडीने केले होते जप्त

मराठी ई-बातम्या टीम देशातील बँकांची तब्बल १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा येत्या काही दिवसांत लिलाव होणार आहे. ही मालमत्ता मुंबतील काळा घोडा येथे आहे. हे घर ७० वर्षे जुने आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही मालमत्ता जप्त केली होती. रिदम हाऊस हे मुंबईचे आयकॉनिक …

Read More »