Breaking News

अर्थविषयक

व्हॉट्सअॅपवरून होणार आता उबर बुकिंग चालकाचे नाव आणि पिकअपची माहिती चॅटवर उपलब्ध

उबर टॅक्सी सेवा आता व्हॉट्सअॅपवरूनही बुक करता येणार आहे. लखनौ शहरातून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. लवकरच देशातील इतर ठिकाणीही ते सुरू होईल. उबर कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपसोबत केलेल्या भागीदारीमुळे आता लोक व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर एसएमएस पाठवून उबेर बुक करू शकतील. उबर अॅप डाउनलोडची गरज नाही उबरच्या व्यवसाय विकासाच्या वरिष्ठ संचालक …

Read More »

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक जीएसटीची वसूली डीपीनंतर जीएसटीमध्येही वाढ, नोव्हेंबरमध्ये १.३१ लाख कोटी जीएसटी संकलन

केंद्र सरकारला नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापासून (जीएसटी) १,३१,५२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटी रुपये होते. सरकारने बुधवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) डेटा जाहीर केला. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नोव्हेंबरमधील हे दुसरे सर्वात मोठे कलेक्शन आहे. …

Read More »

ओमिक्रॉन इफेक्टमुळे विमान भाडे दुप्पट प्रवासी उद्योगावर परिणाम

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. याशिवाय तीन ते चार देशात याचे रुग्ण आढळल्यानंतर सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. पण कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचा परिणाम प्रवासी उद्योगावरही दिसून येतआहे. विमान कंपन्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान भाडे वाढवले आहे. भारतातून US, UK, UAE …

Read More »

१ डिसेंबरपासून होणार आहेत ५ मोठे बदल, जाणून घ्या… पाच गोष्टींमध्ये होणार बदल

मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. पुढचा महिना म्हणजे डिसेंबर महिना अनेक बदल घेऊन येणार आहे. १ डिसेंबरपासून बँकिंग आणि ईपीएफओसह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच ५ बदलांबद्दल सांगत आहोत. पीएफचे पैसे थांबतील युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ३० …

Read More »

साबण, डिटर्जंटच्या किंमती वाढल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेडने वाढविल्या किंमती

मुंबईः प्रतिनिधी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेड यांनी त्यांच्या निवडक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. जास्त उत्पादन खर्चामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे व्हील डिटर्जेंट पावडरच्या एक किलो पॅकची किंमत आता ३.५ % वाढली आहे. अर्धा किलो आणि एक किलोच्या पॅकवर निवडक …

Read More »

Airtel, Vi नंतर आता Jio चेही रिचार्ज महागले २१ टक्क्याने महाग झाले

मुंबईः प्रतिनिधी Airtel आणि Vi (Vodafone-Idea) नंतर, Jio ने देखील आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. जिओने आपल्या प्लॅनमध्ये २१% पर्यंत वाढ केली आहे. Jio च्या ७५ रुपयांच्या प्लॅनसाठी १ डिसेंबरपासून ९१ रुपये भरावे लागतील. नवीन किंमती १२९ रुपयांच्या प्लॅनची किंमत १५५ रुपये, ३९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ४७९ रुपये, १,२९९ …

Read More »

स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी सुवर्ण रोखे योजना सोमवारपासून सुरू

मुंबई: प्रतिनिधी सरकार तुम्हाला पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (सुवर्ण रोखे) गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड २०२१-२२ अंतर्गत २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी असेल. यावेळी सरकारने गोल्ड बाँडची किंमत ४,७९१ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. …

Read More »

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील ६३३ दिवसांनी बंदी उठवली, पण या देशावंर बंदी कायम १५ डिसेंबरपासून परदेशी प्रवासाला जाता येणार

मुंबई: प्रतिनिधी ख्रिसमस आणि नवीन वर्ष देशाबाहेर साजरे करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने १५ डिसेंबरपासून ६३३ दिवसांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाला परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या तीन दिवस आधी २२ मार्च रोजी  सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली होती. १४ देशांच्या प्रवासावर बंदी कायम आता ज्या …

Read More »

या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात ७ महिन्यांतील दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण कोरोना व्हेरिएंटमुळे घसरण झाली बाजारात

मुंबई: प्रतिनिधी सेन्सेक्सने शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६५० अंकांची घसरण नोंदवली. याचे मूळ कारण कोरोनाचे नवीन प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ७ महिन्यांतील बाजारातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. १८ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स ६१,७६५ वर बंद झाला. तो जानेवारीत ४८ हजारांवर बंद झाला. सेन्सेक्सने १९ ऑक्टोबर रोजी …

Read More »

स्वस्तात घर खरेदीची संधी, पीएनबी करणार लिलाव ई-ऑक्शनद्वारे स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी

मुंबईः प्रतिनिधी तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. पीएनबी या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. २६ नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातात. पीएनबीने …

Read More »