Breaking News

अर्थविषयक

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटींचा फटका बाजार १४०० अंकानी कोसळला

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे शुक्रवारी देशातील शेअर बाजारात हाहाकार माजवला. सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार आपटले.BSE सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला. यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. सकाळी सेन्सेक्स ५४०.३ अंकांच्या घसरणीसह ५८,२५४.७९ वर उघडला. त्यानंतर ही घसरण तब्बल १,४८८ अंकांपर्यंत गेली. दुसरीकडे, निफ्टीमध्येही आतापर्यंत ४४८.०५ …

Read More »

गौतम अदानी आणि मुकेश अंबानींची बरोबरी दोघांकडे ६.६३ लाख कोटी रुपयांची संपत्ती

मुंबई: प्रतिनिधी अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आता मालमत्तेच्या बाबतीत समान पातळीवर आहेत. दोघांची मालमत्ता ६.६३-६.६३ लाख कोटी रुपये आहे. डॉलरमध्ये ती ८९ अब्ज डॉलर आहे. दोन बिझनेस टायकून आता आशियातील सर्वात श्रीमंत आणि समान पातळीवर आहेत. बुधवारी अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल …

Read More »

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो २ डिसेंबर रोजी बंद होईल. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स १० डिसेंबर रोजी शेअर बाजाराता सूचीबद्ध केले जातील. आयपीओद्वारे स्टार हेल्थ ७,५०० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमध्ये प्रती शेअर किंमत ८७० ते ९०० रुपये निश्चित करण्यात …

Read More »

बिस्कीट महागले, पार्ले जीच्या किंमतीत ५-१० टक्क्यांनी वाढ पार्ले बिस्टीक कंपनीने केली दरवाढ जाहीर

मुंबईः प्रतिनिधी बिस्किटांचे सर्वात स्वस्त आणि लहान पॅकेट उपलब्ध करून देणाऱ्या पार्ले-जी कंपनीने आपल्या दरात वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे किंमती वाढवल्या असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने बिस्किटांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ केली. अलीकडच्या काळात बिस्किटे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. कंपनीचे …

Read More »

कपड्यांपासून मोबाईल आणि टीव्ही महागणार, ५ ते ६ टक्क्यांनी महागणार? ५-१० टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी मालवाहतुकीचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. पण उच्च इनपुट (उत्पादन) खर्चामुळे कपड्यांपासून ते मोबाईल फोन आणि टीव्ही येत्या काही महिन्यांत महाग होतील. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपन्या आता ग्राहकांवर बोजा टाकण्याच्या तयारीत आहेत. पुढील महिन्यापर्यंत टेलिव्हिजन, स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या किमती ५ …

Read More »

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना झटका, बचत खात्यावरील व्याजात कपात १ डिसेंबरपासून नवे दर लागू

मुंबईः प्रतिनिधी देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने (PNB) खातेदारांना धक्का दिला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदर २.९० वरून २.८० टक्के पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून नवे दर लागू होतील. शिल्लकीवर किती व्याज मिळेल? १ डिसेंबर …

Read More »

देशाची अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढण्याचा अंदाज पहिल्या तिमाहीत ८.१ टक्क्याने वाढीचा अर्थतज्ञांचे म्हणणे

मुंबईः प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान देशाची अर्थव्यवस्था सुमारे ९ टक्के दराने वाढू शकते. जगभरातील सर्व अंदाजांमध्ये आणि खुद्द सरकारच्या अंदाजात ही बाब समोर आली आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यावर सतत लक्ष केंद्रित करणे आणि खाजगी क्षेत्र आणि सरकारचे खर्च. …

Read More »

ऑडिट रिपोर्टमधील माहिती देण्यास सेबीचा नकार एमएसईआयच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टची माहिती लपविण्याचा प्रयत्न

मुंबईः प्रतिनिधी देशभरातील वित्तीय संस्था सदस्य असलेल्या एमएसईआयमधील आर्थिक नियमततेबद्दल अहवाल फॉरेंन्सिकने दिला आहे. तसेच एमएसईआय कमी होत चाललेल्या व्यापार खंडासह तोटा सहन करत आहे. एक्स्चेंजची कॅश नेटवर्थ सेबीने ठरवलेल्या रु. १०० कोटीच्या अगदी खाली घसरली आहे. एमएसईआय मध्ये सन २०१७-१८ पासून आर्थिक अनियमितता आहे. एमएसईआय मधील फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टची …

Read More »

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, या बँकेत होणार विलीन रिझर्व्ह बँकेने विलीनीकरणाला दिली मंजुरी

मुंबईः प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पीएमसी बँकेच्या युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. विलीनीकरणामुळे बँकेच्या ग्राहकांना ३ ते १० वर्षात जमा केलेली रक्कम मिळणार आहे. PMC बँक दिल्लीतील युनिटी स्मॉल फायनान्स बँक …

Read More »

एचडीएफसीने रिलायन्सला मागे टाकले, टाटा समूह दुसऱ्या क्रमांकावर मार्केट कॅपमध्ये चांगलीच वाढ

मुंबईः प्रतिनिधी एचडीएफसी समूह आता मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. एचडीएफसीने रिलायन्स समूहाला मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १५.२४ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या समभागांना फटका शेअर बाजारातील सततची घसरण आणि गुरुवारी रिलायन्स …

Read More »