Breaking News

अर्थविषयक

गॅस सिलिंडरपासून अपघात झाल्यास मिळेल ५० लाखांची भरपाई, जाणून घ्या… घराच्या नुकसानीसाठीही करता येणार दावा

मुंबई: प्रतिनिधी आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर आहे. छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो म्हणून गॅस सिलिंडरचा वापर अत्यंत जपून केला जातो. अशा परिस्थितीत एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, हेही जाणून घेतले पाहिजे. ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा एलपीजी कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकाला वैयक्तिक अपघात कवच देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यामुळे अपघात झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा हा विमा आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे. या विम्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा  कंपन्यांशी भागीदारी आहे. डिलिव्हरीपूर्वी सिलिंडर पूर्णपणे ठीक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या …

Read More »

PF व्याजाचे पैसे आले नाहीत तर येथे करा तक्रार १ मिनिटात जाणून घ्या तुमची शिल्लक

मुंबईः प्रतिनिधी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार EPF बचतीवर ८.५ टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे पीएफ खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरी बसून पाहू शकता. याशिवाय जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर …

Read More »

खराब CIBIL स्कोअरमुळे कर्ज मिळवण्यात अडचण, या मार्गांनी CIBIL सुधारा आणि मिळवा सहज कर्ज

मुंबई: प्रतिनिधी अनेकदा लोक गृहकर्ज, कार कर्ज किंवा इतर गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतात. पण कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला CIBIL स्कोअर तुम्हाला कमी व्याजदरात आणि सहज कर्जमिळवण्यास मदत करतो. तुमचा CIBIL स्कोर खराब होण्याची अनेक कारणे आहेत. आम्हीतुम्हाला या कारणांबद्दल आणि क्रेडिट स्कोअर कसा दुरुस्त करता येईल याबद्दल सांगत आहोत. या कारणांमुळे CIBIL स्कोअर खराब होतो – जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल किंवा कमी होईल. – तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही बिल वेळेवर भरले नाही, तर त्याचा तुमच्या क्रेडिट – स्कोअरवर विपरीत परिणाम होतो. – तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही किंवा त्यात उणे शिल्लक असली तरीही तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा CIBIL स्कोर सुधारू शकता वेळेवर बिले आणि हप्ते भरा कर्ज किंवा इतर कोणतेही EMI आणि क्रेडिट कार्डची देय रक्कम आगाऊ परतफेड करणे आवश्यक आहे. ही सवय कायम ठेवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका. क्रेडिट मर्यादेचा वापर जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा खर्चावर मर्यादा असते. याला क्रेडिट मर्यादा म्हणतात. चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी क्रेडिट मर्यादेच्या ३०% पेक्षा जास्त वापर केला जाऊ नये. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास, तुम्हाला क्रेडिट वापरकर्ता म्हणून पाहिले जाते. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. कर्ज परतफेड ज्या व्यक्तीचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड चांगला असतो, त्याचा क्रेडिट स्कोरही तितकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेऊ शकता. ते वेळेवर परत केल्यावरही तुमचा CIBIL स्कोर सुधारेल. चांगला CIBIL स्कोअर मिळविण्यासाठी कर्जाचा इतिहास चांगला असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे कर्ज, सुरक्षित किंवा असुरक्षित, अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा समावेश असू शकतो. क्रेडिट कार्ड बंद करू नका तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते बंद करणे टाळावे. त्यासोबत खरेदी करत रहा आणि तुमची बिले भरत राहा. याशिवाय तुम्ही तुमच्या संयुक्त खात्यातील खाती, CIBIL स्कोअर यांचे सतत पुनरावलोकन केले पाहिजे. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, ग्राहक EMI भरण्यासाठी तितकाच जबाबदार असतो. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. CIBIL स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक चांगला CIBIL स्कोअर ३०० ते ९०० गुणांपर्यंत असतो. जर गुण ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर कर्ज मिळणे सोपे आहे. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळणे सोपे होईल. CIBIL स्कोअर २४ महिन्यांच्या क्रेडिट इतिहासावर आधारित आहे. CIBIL स्कोअर कशावर अवलंबून आहे? ३०% CIBIL स्कोअर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून असतो. सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर २५%, क्रेडिट एक्सपोजरवर २५% आणि कर्जाच्या वापरावर २०% CIBIL स्कोअर कशावर अवलंबून असतो. Share on: WhatsApp

Read More »

गृहकर्ज महागण्यास सुरूवात कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदरात वाढ

मुंबई: प्रतिनिधी गृहकर्ज आता महाग होऊ लागले आहे. खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने याची सुरुवात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडूनआता ६.५५ टक्के दराने  गृहकर्ज देण्यात येणार आहे. आतापर्यंत हा व्याजदर ६.५० टक्के होता. नवीन व्याजदर ९ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत लागू होतील, असे बँकेने म्हटले आहे. ९ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर या दोन्ही दिवशीही तो लागू होईल. …

Read More »

आयकर विवरणपत्रात दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती देणे आवश्यक अन्यथा पडेल महागात

मुंबईः प्रतिनिधी दिवाळी आणि भाऊबिजेला भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे. तुम्हालाही सणासुदीला भेटवस्तू मिळाल्या असतील तर त्यावर आयकर भरावा लागेल. त्यामुळे आयटीआर भरताना तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. दिवाळी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मिळालेली भेटवस्तू ही इतर स्त्रोतांची मिळकत …

Read More »

शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात मिळणार पैसे शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम

मुंबईः प्रतिनिधी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख शेअर बाजार आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 प्रणाली जाहीर केली. शेअर बाजार आणि संस्थांनी सांगितले की, त्यांनी समभागांच्या सेटलमेंटच्या T+1 प्रणालीसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम २५ फेब्रुवारी २०२२ पासून …

Read More »

अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाला आले भान: पेट्रोल-डिझेल इतक्या रूपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील ८ ते ९ महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज ३० पैसे ४५ पैशाने वाढ करत पेट्रोलच्या दराने ११० रूपयांचा टप्पा पार केला. तर डिझेलनेही १०० री पार करत महागाई वाढीला हातभार लावला. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला या भाव वाढीमुळे नागरीकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

सप्टेंबर तिमाहीत एसबीआयला ७६२७ कोटींचा नफा एसबीआय मार्केटच्या कॅपमध्ये वाढ

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सप्टेंबर तिमाहीत ७,६२७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ६६.७३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बँकेला ४,५७४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. निकालानंतर बँकेच्या शेअर्सचा भाव ३ टक्क्यांनी वाढून ५३२ रुपयांवर गेला. …

Read More »

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ वेळी होणार शेअर बाजारातील व्यवहार ट्रेडिंग मात्र एक तासासाठी सुरु राहणार

मुंबईः प्रतिनिधी दिवाळीत शेअर बाजार बंद राहतील. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ट्रेडिंग एक तासासाठी असेल. यावेळी संवत २०७७ ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक शुभ मानली जाते. हिंदू परंपरेनुसार या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग सत्रात गुंतवणूक करणे शुभ असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीला शेअर …

Read More »

१ नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम, जाणून घ्या कोणते असतील बदल व्हॉट्सअॅप होणार यावर फोनवर बंद

मुंबई: प्रतिनिधी देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. पुढील महिन्यापासून काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. याशिवाय १ नोव्हेंबरपासून SBI ग्राहकांना व्हिडिओ कॉलद्वारे जीवीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधाही मिळणार आहे. याशिवाय १ नोव्हेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. गॅस सिलिंडर महाग होऊ शकतो एलपीजी सिलिंडरची नवीन …

Read More »