Breaking News

अर्थविषयक

पीएफ खातेदारांना दिवाळीची भेटः यंदा मिळणार ८.५ टक्के व्याज चालू वर्षापासून मिळणार व्याज वाढीव

मुंबईः प्रतिनिधी प्रॉव्हिडंट फंड ( पीएफ) खातेदारांसाठी आता खूशखबर आहे. केंद्र सरकारने पीएफ खातेदारांना दिवाळीची भेट दिली आहे. पीएफवर आता ८.५ टक्के व्याज मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर केला आहे. यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या …

Read More »

पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबरला खुला, लिस्टींगनंतर पेटीएम मार्केट कॅपमध्ये टॉप ३५ कंपन्यांमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

मुंबईः प्रतिनिधी येत्या १० दिवसांत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. शेअर बाजारात ६ कंपन्या आयपीओमार्फत येत आहेत. यामध्ये सर्वात मोठा आयपीओ पेटीएमचा असणार आहे. १८ नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्टींग झाल्यानंतर पेटीएमचा मार्केट कॅपनुसार सर्वात मोठ्या ३५ कंपन्यांमध्ये समावेश होईल. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. पेटीएमचा आयपीओ ८ …

Read More »

आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती तीन वर्षासाठी केंद्र सरकारकडून नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पुढील तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने १० नोव्हेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी …

Read More »

पॉलिसी बाजारचा आयपीओ १ नोव्हेंबरला खुला, ‘इतकी’ आहे प्राइस बँड ३ नोव्हेंबरला बंद होणार

मुंबई: प्रतिनिधी ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी पॉलिसी बाजारचा आयपीओ १ नोव्हेंबर उघडत आहे. याशिवाय पैसा बाजारची मूळ कंपनी PB Fintech चा आयपीओ देखील या दिवशी उघडणार आहे. दोन्ही आयपीओ ३ नोव्हेंबरला बंद होतील. पॉलिसी बाजारच्या इश्यूची किंमत ९४०-९८० रुपये निश्चित करण्यात आली आहे. आयपीओनंतर पॉलिसी बाजार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर …

Read More »

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गृहकर्ज या बँकेकडून युनियन बँकेकडून ०.४० टक्क्यांची कपात

मुंबई: प्रतिनिधी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी बँकांनी आपल्या गृहकर्जाचे दर कमी केले आहेत. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. युनियन बँकेने आपल्या गृहकर्जाचा व्याजदर कमी करून ६.४० टक्के केला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात कमी व्याजदर आहे. याआधी कोणत्याही बँकेने इतक्या स्वस्त …

Read More »

अॅक्सिस बँकेला सप्टेंबर तिमाहीत विक्रमी नफा कॅनरा बँकेचा नफा दुप्पट

मुंबई: प्रतिनिधी दोन खाजगी आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मंगळवारी आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये अॅक्सिस बँक आणि कॅनरा बँकेने सप्टेंबर तिमाहीत सर्वाधिक नफा कमावला. सेंट्रल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने सप्टेंबर तिमाहीत ३,१३३ कोटी रुपयांचा …

Read More »

देशातील १३ विमानतळांचे पीपीपी पध्दतीने खाजगीकरण ३१ मार्चपर्यंत पीपीपी मॉडेलवर लागणार बोली

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार आपल्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. आता विमानतळांचेही खाजगीकरण करण्यात येणार आहे. सरकारला आपल्या मालकीची एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) द्वारे संचालित १३ विमानतळे मार्च २०२१ पर्यंत खाजगी हातात सोपवायची आहेत. याबाबत एएआयचे अध्यक्ष संजीव कुमार म्हणाले की, आम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बोली …

Read More »

गुंतवणुकीसह कर बचतही हवीय? पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ८० सी खाली करात सवलतही मिळू शकते

मुंबई: प्रतिनिधी पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते. पोस्टल सेवेसह पोस्ट अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजना चांगला परतावा देणाऱ्या आहेत. यामधील काही योजना कर वाचवण्यासाठीही फायदेशीर आहेत. या योजनांना शासकीय हमी मिळते. म्हणजे आपले पैसे कधीही बुडणार नाहीत. यापैकी बऱ्याच योजना अशा आहेत की आयकर कायद्यातील कलम 80 सी …

Read More »

देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी सेबीची मंजुरी पेटीएमची १६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमला आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली आहे. आयपीओद्वारे १६,६०० कोटी रुपये उभारण्याची पेटीएमची योजना आहे. कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लिस्ट होऊ शकते. पेटीएम भारतातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येत आहे. जर पेटीएमने १६,६०० कोटी …

Read More »

पुढील आठवड्यात आणखी २ आयपीओ येणार गुंतवणुकदारांना गुंतवणूकीची संधी

मुंबई: प्रतिनिधी पुढील आठवड्यात दोन कंपन्या आयपीओ आणणार आहेत. नायका (Nykaa) ५,४०० कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँक ३०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारणार आहेत. या महिन्यात येणारा हा पहिला आयपीओ आहे. मात्र, या महिन्यात दोन आयपीओ सूचीबद्ध करण्यात आले. यामध्ये एक बिर्ला म्युच्युअल फंड आणि दुसरा पारस डिफेन्सचा आयपीओ होता. फिनो पेमेंट्सचा …

Read More »