Breaking News

अर्थविषयक

आयकर विभागाने दिला करदात्यांना परतावा, तुम्हाला मिळाला की नाही असे करा चेक ६३ लाख करदात्यांना दिला परतावा

मुंबई : प्रतिनिधी आयकर विभागाने १ एप्रिल २०२१ ते १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६३.२३ लाख करदात्यांना ९२,९६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. यातील ६१.५३ लाख करदात्यांना वैयक्तिक आयकर परतावा म्हणून २३,०२६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. त्याचवेळी १.६९ लाख करदात्यांना ६९,९३४ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आला आहे. …

Read More »

दिवाळी आधी स्वस्तात सोने खरेदीची संधी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम लवकरच सुरू

मुंबई: प्रतिनिधी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपल्याला आता स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२१-२२ ची सातवी सिरीज २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. ही योजना …

Read More »

‘जीएसटी‘ तील सुधारणेसाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली देशातील अर्थमंत्र्यांची बैठक केंद्रीय स्थायी मंत्रीगटाचे अध्यक्ष अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन वस्तू व सेवा करयंत्रणा (जीएसटीएन) सोपी, सुरळीत, दोषविरहीत करण्यासाठी देशातील अनेक राज्यांकडून चांगल्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. उर्वरीत राज्यांकडून येणाऱ्या सूचनांचा आढावा घेऊन सर्वंकष अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे निर्देश ‘जीएसटी’च्या केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दिले. हा अहवाल जीएसटी सुधारणांसाठी स्थापन केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाच्या पुढील …

Read More »

तीन दिवसांत सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला, मार्केट कॅप ९ लाख कोटींनी घटले ६१ हजारानंतर पुन्हा सेन्सेक्स मध्ये पुन्हा घट

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून देशातील शेअर बाजार नवनवीन विक्रम करत आहेत. सेन्सेक्स, निफ्टीतील  तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र, आता बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये तब्बल १ हजार अंकांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे कंपन्यांचे मार्केट कॅप ९ लाख …

Read More »

या बँकाकडून होम लोनवर मिळवा १२ ईएमआयची सूट अॅक्सिस बँक- इंडसइंड बँकेची आकर्षक ऑफर

मुंबई: प्रतिनिधी देशातील दोन आघाडीच्या खाजगी बँका अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेने सणापूर्वी दोन मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर्समध्ये अॅक्सिस बँक गृह कर्जावर १२ मासिक हप्त्यांची (ईएमआय) सूट देणार आहे. म्हणजे कर्जदाराचे १२ ईएमआय माफ होणार आहेत. इंडसइंड बँकेनेही आकर्षक ऑफर दिली आहे. बँकेने आपल्या ऑफरमध्ये डेबिट कार्डवर खरेदी …

Read More »

गृहकर्जासोबतच घ्या घराचा विमा, नुकसानीपासून वाचण्यासाठी आवश्यक या गोष्टी करा घराच्या विम्यासाठी

मुंबई: प्रतिनिधी आपलं हक्काचं घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. खऱेदी केलेल्या घरात आपली भावनिक गुंतवणूक असते. आपले घर नेहमी सुरक्षित असावे, नैसर्गिक आपत्ती, आग आदी घटनांमध्ये आपल्या घराचे नुकसान होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे अशा नुकसानीपासून वाचण्यासाठी गृहकर्ज घेताना विमा घेणे अत्यावश्यक आहे. गृह विमा असल्यास आपल्या घराच्या नुकसानीची …

Read More »

विमान प्रवाशांची संख्या वाढतेय, गतवर्षीच्या तुलनेत ७९ टक्क्याने वाढ सप्टेंबरमध्ये देशात ७०.६६ लाख प्रवाशांचा हवाई प्रवास

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाचा उद्रेक कमी होताच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सप्टेंबरमध्ये देशात सुमारे ७०.६६ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत ही आकडेवारी ७९ टक्के अधिक आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ३९.४३ लोकांनी हवाई प्रवास केला होता. नागरी उड्डान महासंचालनालयाने (डीजीसीए) ही आकडेवारी जाहीर केली …

Read More »

गुंतवणूकदारांना कमाईची संधी, आयपीओसाठी सेबीकडून ६ कंपन्यांना परवानगी १९ हजार कोटींच्या उभारणीसाठी बाजारात

मुंबई: प्रतिनिधी गुंतवणूकदारांना आता शेअर बाजारात आणखी कमावण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसातच अनेक कंपन्या आपला आयपीओ आणणार आहेत. शेअर बाजार नियामक सेबीने ६ कंपन्यांना आयपीओ आणण्यास मान्यता दिली आहे. आयपीओद्वारे या कंपन्या १९ हजार कोटी रुपये उभारणार आहेत. यासह आणखी ५२ कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. आयपीओ आणण्यास सेबीने …

Read More »

ऑक्टोबरमध्ये गृहकर्ज, आयटीआर दाखल करण्यासह या ४ गोष्टी करा अन्यथा होईल नुकसान

मुंबई: प्रतिनिधी अनेक महत्वाची कामे करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर एचडीएफसी बँकेची विशेष ऑफर या महिन्यात ३१ ऑक्टोबरला संपेल. याशिवाय या महिन्यात पीएम किसान योजनेत नोंदणी करून तुम्ही दुहेरी लाभ मिळवू शकता. आम्ही तुम्हाला अशा ४ गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला …

Read More »

मोठी बातमी: एसबीआयला १ कोटी तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला २ कोटींचा दंड मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल ६ बँकांना दंड ठोठावला

मुंबई: प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) १ कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला १.९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एसबीआयने खात्यांमधील फसवणुकीची माहिती देण्यात विलंब केल्याने आरबीआयने हा दंड केला आहे. एसबीआयच्या ग्राहक खात्याची छाननी केली …

Read More »