Breaking News

अर्थविषयक

डिझेल महागले, पेट्रोलचा दर स्थिर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होवूनही दर स्थिर

मुंबई: प्रतिनिधी पेट्रोलियम कंपन्यांनी १८ दिवस इंधन दरवाढ स्थिर ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा भाव वाढवले आहेत. शुक्रवारमध्ये डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात मात्र वाढ करण्यात आली नाही.  पेट्रोलचा भाव सलग १९ व्या दिवशी स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. मात्र, देशात पेट्रोलियम कंपन्यांनी …

Read More »

अवघ्या ६ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत स्मार्टफोन, ‘हे’ आहेत पर्याय स्मार्ट फोन आता आपल्या बजेटमध्ये

मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षात स्मार्टफोन ही अत्यावश्यक गरज झाली आहे. कमी किंमतीत आणि चांगले फिचर (features) असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. स्वस्तातील आणि चांगले तसंच आवश्यक फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होऊ शकते. तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल …

Read More »

एलआयसीच्या आयपीओमध्ये सरकारला नकोय चिनी गुंतवणूक रोखण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यांयाचा विचार

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी -LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओ (IPO) मध्ये सरकार चिनी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर बंदी घालू शकते. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादामुळे भारत सरकार हे पाऊल उचलले जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत विमा बाजारात …

Read More »

१ ऑक्टोबरपासून टाटाची वाहने महागणार टाटा कंपनीने केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सची वाहने आता महागणार आहेत. आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा टाटा मोटर्सने केली आहे. १ ऑक्टोबरपासून किमतीतील ही वाढ लागू होणार आहे. टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती २ टक्क्याने वाढवणार आहे. किंमतीतील वाढ मॉडल आणि वाहनाच्या व्हेरिअंटवर आधारीत असणार आहे. …

Read More »

खात्यात किमान शिल्लक नसल्याने पीएनबीच्या खातेदारांना भुर्दंड माहिती अधिकार मधून मिळाली धक्कादायक माहिती

मुंबई: प्रतिनिधी आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक आहे. किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना बँका दंड आकारतात. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) खातेदारांना या दंडापोटी मोठा भुर्दंड बसला आहे. पीएनबीने खातेदारांकडून कोट्यवधी रुपयांचा  दंड वसूल केला आहे. खात्यात किमान शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात …

Read More »

प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी राज्यस्तरीय वाणिज्य उत्सवाची सांगता- निर्यात आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग संचालनालय आणि केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या ‘वाणिज्य उत्सवाची सांगता झाली. यापुढे प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून जिल्हा निहाय निर्यात आराखडा तयार करण्याची …

Read More »

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरणाऱ्यांनो १ ऑक्टोबरपासून ‘ही’ सुविधा होणार बंद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नवा नियम होणार लागू

मुंबई : प्रतिनिधी तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरत असाल तर १ ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. कारण या तारखेपासून तुमच्या बँकिंग व्यवहारांबाबत नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियम माहीत करून घेतला नाही तर तुम्हाला नाहक भुर्दंड पडू शकतो.बँकिंग व्यवहारांच्या नवीन नियमानुसार, जर तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट  कार्डद्वारे कोणत्याही प्रीमियम, बिल किंवा इतर पेमेंटसाठी ऑटो डेबिटची सुविधा सक्रिय केली असेल, तर रक्कम कापण्यापूर्वी बँकेला तुमची संमती घ्यावी लागेल. बँका केवळ  स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच्या आधारे तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या …

Read More »

पीएमसीसह या २१ बँकांच्या खातेदारांना मिळणार ५ लाख रुपये २९ नोव्हेंबर पर्यंत मिळणार पैसे

मुंबई : प्रतिनिधी २१ बुडीत बँकांच्या ग्राहकांना या वर्षी डिसेंबरपर्यंत पैसे मिळू शकतील. ठेवींवर सरकारच्या असलेल्या हमीखाली हे पैसे खातेदारांना मिळतील. या अंतर्गत खातेधारकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. गेल्या महिन्यात संसदेने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२१ मंजूर केले. यानुसार, आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या ९० दिवसांच्या आत खातेधारकांना ५ लाख रुपये मिळणार आहेत. बँकांमध्ये ज्या काही ठेवी ठेवल्या जातात, त्या विम्याच्या कक्षेत येतात. याचा अर्थ असा की जर बँक बुडली किंवा दिवाळखोर झाली तर खातेदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपये    मिळतील. अलीकडच्या काळात, पीएमसीसह एकूण २१ सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. यामुळे या बँकांच्या सर्व खातेधारकांना या विम्याअंतर्गत पैसे मिळण्याचा हक्क राहणार आहे. बँकांमधील ठेवींचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केला जातो. डीआयसीजीसीने म्हटले आहे की, बँकेच्या विमा उतरवलेल्या ठेवींच्या ठेवीदारांना पैसे देण्याची योजना आहे. हे पैसे डिसेंबरपर्यंत मिळू शकतात. डीआयसीजीसीने म्हटले आहे की एकूण २१ बँका त्याच्या कक्षेत आहेत. पीएमसी ही सर्वात मोठी बँक आहे. काही आवश्यक सूचना त्या बँकांना दिल्या आहेत. बँकांना ४५ दिवसांच्या आत आपले दावे सादर करावे लागतील. त्यानंतर या दाव्यांची छाननी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर पुढील ४५ दिवसात बँकेला पैसे दिले जातील आणि ते पैसे खातेदारांना दिले जातील. याचा अर्थ २९ नोव्हेंबरपर्यंत बँकेच्या दाव्यांची छाननी केली जाईल. DICGC सुधारणा विधेयक ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेत मंजूर झाले. यामध्ये बँक ठेवींवरील विमाधारक हमी ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे पैसे रिझर्व्ह बँकेच्या स्थगिती कालावधीनंतर ९० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजेत. पूर्वी विम्याची रक्कम एक लाख रुपये असायची. या २१ बँकाच्या ठेवीदारांना मिळेल भरपाई १) अदूर को ऑप. अर्बन बँक, केरळ २) बिदर महिला अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र …

Read More »

एचडीएफसीची गृहकर्ज व्याजदरात कपात, ‘हा’ आहे नवा दर नव्या गृह कर्जदारांनाही मिळणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृहकर्जावर मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या सर्व स्लॅबवर ६.७० टक्के व्याज आकारले जाईल. एचडीएफसीची ही ऑफर सर्व नवीन गृहकर्जावर २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. हा विशेष दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेला आहे. कर्जदारांना या योजनेचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार …

Read More »

निफ्टीची १० हजाराने वाढ: रिलायन्सचा सर्वाधिक वाटा, सरकारी कंपन्या पिछाडीवर निफ्टीचा ७५११ ते १७५१९ पर्यंतचा प्रवास

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून १० हजारांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक योगदान दिले आहे. निफ्टीच्या या वाढीत रिलायन्सने तब्बल एक हजार अंकांचे योगदान दिले. तर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे या वाढीसाठी फार कमी योगदान राहिले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निफ्टी ७५११ अंकांवर …

Read More »