Breaking News

अर्थविषयक

खुशखबर ! राज्यातील हॉटेल्स-लॉज लवकरच सुरु हॉटेल्स असोसिएशनसमवेत बैठकीत लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे …

Read More »

महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी १० हजार कोटी द्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने तात्काळ दहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती एका पत्राद्वारे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांच्याकडे केली. राज्यात गेल्या ३ महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणला फार मोठया व अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या काळात …

Read More »

केंद्रांच्या निर्णयानंतर ठाकरे सरकार चीनी कंपन्यांबाबत निर्णय घेणार, सध्या जैसे थे उद्योचग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लडाख येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या चीन सैनिकांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चीनच्या विरोधात भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुंतवणूकीच्यादृष्टीने चीनी कंपन्यांसोबतच्या सांमज्यस कराराला जैसे थे ठेवण्याचे धोरण स्विकारले असून यासंदर्भात केंद्र अर्थात मोदी सरकारने धोरण स्पष्ट केल्यानंतरच गुंतवणूकीला मान्यता द्यायची कि रद्द करायचे याबाबतचा निर्णय घेण्यात …

Read More »

आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती रिअल इस्टेटच हाउसिंग डॉट कॉम आणि नरेडकोचा सर्वेक्षण

मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी हाऊसिंग डॉट कॉम आणि नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको) यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या ‘कन्सर्न्ड येट पॉसिटीव्ह – द इंडियन रिअल इस्टेट कंस्यूमर (एप्रिल – मे २०२०) या अहवालानुसार रिअल इस्टेट ग्राहक येत्या सहा महिन्यांसाठी आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्न स्थिरतेच्या बाबतीत सकारात्मक आहेत. रिअल इस्टेट (३५%) …

Read More »

चीनसह १२ देशांची राज्यात १६ हजार कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री देसाईंच्या उपस्थिती करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई: प्रतिनिधी एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करुत. हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र …

Read More »

राज्यात ४ वर्षात १४ खाणी सुरु होत १३ हजार जणांना मिळणार रोजगार आदासा येथे कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते शुमारंभ

मुंबई: प्रतिनिधी आगामी ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली. नागपूर जवळील आदसा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

लॉकडाऊन असतानाही रायगडमध्ये गुतंवणूकीसाठी उद्योजक उत्सुक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत दीघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. यामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगार संधी निर्माण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मे पाठोपाठ जून महिन्यातही कर्ज ? आर्थिक जमवाजमव करण्यासाठी वित्त विभागाची दमछाक

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड विरोधी लढ्याला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व योजनांसाठीचा निधी, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार राखीव ठेवण्यात आलेला निधी आतापर्यत वापरला. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याची गंगाजळी आटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मे महिन्यात कर्ज काढण्यात आले. आता पुन्हा एकदा जून महिन्याच्या पगारीसाठी कर्ज …

Read More »

देशात गंभीर आर्थिक मंदी, चौकटीबाहेर जावून खर्च करण्याची गरज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

कराड : प्रतिनिधी कोरोना  लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लोकांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती संपली आहे व बाजारपेठेत मागणी (demand) नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरवठादारांच्या किंवा उद्योगांच्या मालाची विक्री (supply) होणे अवघड होणार आहे. जागतिक अर्थतज्ञांनी भारतामध्ये गंभीर आर्थिक मंदीचे भाकीत वर्तविले असून मागणी वाढावी यासाठी सरकारने चौकटी बाहेर …

Read More »

आता ३१ ऑगस्टपर्यत कर्जथकबाकी वसूलीसाठी तगादा नाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक संस्था आणि केंद्रे बंद आहेत. त्यामुळे कर्ज थकबाकीदारांकडे पुढील आणखी तीन महिने तगादा लावू नये असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांनी दिले. तसेच बँकेच्या रेपो रेट मध्ये ०.४ टक्क्याने कपात करण्यात आली सून रिझर्व्ह रेपो रेट मध्ये ३.३५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने …

Read More »