Breaking News

अर्थविषयक

मुंबईत १५ तारखेपासून सेवा क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक प्रदर्शन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’च्या यशानंतर मुंबईत प्रथमच चार दिवसांची ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हीसेस’मुंबईत येत्या १५ तारखेपासून आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला २२ सेवा क्षेत्रातील १०० देशांमधून पाच हजार पेक्षा जास्त सेवा उद्योजक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असून, राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात एकाही विकास कामांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल नको कर्जातील निधी व्यतीरिक्त वाढीव रकमेचा बोजाही राज्याच्या तिजोरीवर पडणार

मुंबई : गिरिराज सावंत राज्याच्या डोक्यावर तब्बल ४ लाख १३ हजार कोटी रूपयांचे कर्ज असतानाच आणखी ३ लाख ४१ हजार कोटी रूपयांचे कर्ज काढून ठिकठिकाणी विकास कामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या एकाही विकास कामाचा अर्थात पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आर्थिक व्यवहार्य अहवाल अर्थात फायनान्शियल व्हायबल रिपोर्ट …

Read More »

सप्टेंबरमध्ये राज्याचे नवे उद्योग धोरण अंमलात आणणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासन सप्टेंबर, २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्मॉल मिडीयम एटंरप्राइजेस ( एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. या वेळी केंद्रीय नीती आयोगाचे …

Read More »

महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार गोदरेज, शापूरजी पालनजी, सुप्रीम पेट्रोकेम, कृष्णा यासह अनेक संस्थांचा समावेश

नवी दिल्ली : प्रतिनिधी बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री  संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील ७२ व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार …

Read More »

७ लाख शिकाऊ उमेदवारांना उद्योजकांनी संधी द्यावी उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीप अर्थात शिकावू कामगारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाख शिकावू उमेदवारांना संधी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तसेच ७ लाख शिकावू उमेदवारांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता …

Read More »

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना सरकार प्रोत्साहन देणार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे फ्रांसच्या शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले. मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या …

Read More »

बिटकॉईन स्किम फसवणूक प्रकरणाची चौकशी ईडीकडे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची विधानसभेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेन बिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉन्झी स्कीम सूरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोटयावधीची गुंतवणूक करताच  ही स्किम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास …

Read More »

राज्याच्या तिजोरीत १५ हजार कोटींची तूट ३ लाख १ हजार कोटींचा खर्चाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाचा आणि आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखविणाऱ्या अर्थसंकल्पाचे वाचन करत ३ लाख १ हजार ३४२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज राज्याच्या विधिमंडळात सादर करण्यात आला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर तर विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी राज्याच्या तिजोरीत १५ हजार ३७४.९० कोटी रूपयांची …

Read More »

अर्थसंकल्पीय लाईव्ह अपडेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करताना....

*विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांसाठी १ हजार ६८७ कोटी ७९ लक्ष रू. निधीची तरतूद *अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी ९९४९. २२ कोटींची भरीव तरतूद *अकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून विक्री केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस. …

Read More »

राज्यावर ४२ हजार कोटींनी कर्ज वाढले तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ३६ हजार रुपयांचे कर्ज

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी राज्यावर तीन लाख ७१ हजार ४७ कोटींचे कर्ज होते. यावर्षी या कर्जात ४१ हजार ४७ कोटींची वाढ झाली आहे. एकूण कर्जाचा आकडा हा अर्थसंकल्पाच्या आधीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर ३६ हजार रूपयांचे कर्ज असल्याचे राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात नोंदविण्यात आले …

Read More »