Breaking News

अर्थविषयक

२०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के राहणार? नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात जागतिक बँकेचा अंदाज

मुंबई: प्रतिनिधी गेल्या वर्षभरात चलन निश्चलीकरण आणि जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे भारताची आर्थिक गाडी घसरल्याचा अंदाज देशातील सर्वच तज्ञांनी व्यक्त केला. तसेच त्याचे प्रतिबिंब बाजारातही उमटले. मात्र जागतिक बँकेने मात्र २०१८ हे वर्ष भारतासाठी आश्वासक असल्याचे चित्र मांडत भारताचा विकास दर ७.३ वर पोहचेल असा विश्वास २०१८ ग्लोबल इकॉनामिक्स अहवालात …

Read More »

महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी आता मॅग्नेटीक महाराष्ट्र फेब्रुवारीत होणाऱ्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मेक इन महाराष्ट्रनंतर पुन्हा एकदा मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात नरीमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट …

Read More »

कर विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोन दिवस रजा आंदोलन राज्यातील ११ हजार कर्मचारी संपावर गेल्याने कर वसुलीचे काम ठप्प

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील उद्योग आणि दुकानदारांकडून वस्तू व सेवा कर गोळा करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून दोन दिवसांच्या सामुहीक रजा आंदोलनाच्या मार्फत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कर वसुलीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावर होणार आहे. पूर्वीचा विक्रीकर तर आताचा महाराष्ट्र वस्तू व …

Read More »

रुपयाची मजबूती सरकारसाठी आव्हानात्मक निर्यातीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी मंगळवारी दिवसाचे कामकाज सुरु होताच डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी वाढून डॉलरचा दर ६३ रूपये ५० पैशांवर पोहचला. अडीच वर्षातील रूपयाचा हा उच्चांकी भाव आहे. वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीत रुपया मजबूत राहण्याची आशा असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. तसेच अर्थसंकल्पा पर्य़ंत रुपया ६२ रूपये ८० पैशापर्यत येण्याची शक्यता आहे. …

Read More »

प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली

मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबरमध्ये प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार राहिली आहे. या महिन्यात प्रमुख ८ उद्योग क्षेत्रांनी ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ऑक्टोंबरमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ५ टक्के होता. ऱिफायनरी, सिमेंट आणि स्टील उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रमुख उद्योग क्षेत्रांची कामगिरी चांगली राहिली असल्याचे उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले …

Read More »

नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी एसबीआयकडून नव्या वर्षाची भेट कर्जावरील व्याजदरात कपात

मुंबईः प्रतिनिधी नव्या वर्षात नागरीकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने कर्जधारकांसाठी खास भेट आणली आहे. या भेटीच्या माध्यमातून कर्जासाठी ईएमआय घटणार आहे. एसबीआयने आपला कर्जाचा आधार दर (बेस रेट) ०.३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज .३० टक्क्याने स्वस्त …

Read More »

कार घ्यायचीय ? भरा फक्त मासिक पाच हजार बँकांची स्वस्त कार योजना

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरण्याचे स्थिती जवळ आली असून फक्त ५ हजार रूपयांच्या मासिक ईएमआयवर कार घेणे सोपे झाले आहे. सद्या बाजारात मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अनेक कार आहेत. यासाठी फक्त १ ते २ लाख रुपये डाऊन पेमेंट करून मासिक ५ हजार रूपयांच्या …

Read More »

कंपन्या आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी सरते वर्ष अच्छे वर्ष वर्षभरात कंपन्याचे भागभांडवल ४५ लाख ५० हजार कोटींनी वाढले

मुंबईः नवनाथ भोसले भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी २०१७ हे वर्ष खास गेले आहे. या वर्षी गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल ४५.५ लाख कोटी रुपये वाढली आहे. अनेक कंपन्यांनी छप्पर फाडके परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. सरत्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने २८ टक्क्यांनी जोरदार वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर मुंबई शेअऱ बाजारातील लिस्टेड (नोंदणीकृत) …

Read More »

नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. …

Read More »

वर्ष २०१७ मध्ये सेन्सेक्सने नोंदवली २८ टक्क्यांनी वाढ २६ हजारावर असलेला निर्देशांक वर्षअखेर ३४ हजारावर

मुंबईः नवनाथ भोसले वर्ष २०१७ हे शेअर बाजारासाठी खूपच चांगले राहिले आहे. या वर्षी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांने प्रथमच ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १० हजार ५०० च्या वर पोहोचला. सेन्सेक्स १ जानेवारी२०१७ या दिवशी २६ हजार ५९५.४५ अंकांवर होता. तर २७ डिसेंबर २०१७ ला …

Read More »