Breaking News

‘एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा

देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने, (Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सव्ह्रिसेस ऑर्पोच्युनिटीज, हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, ११ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रँड बॉलरूम, द लीला पॅलेस, बंगळुरू येथे आयोजित केलेला आहे.

उदयोन्मुख माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा (ITES) क्षेत्रातील, महाराष्ट्राचे उत्कृष्ट स्थान आणि भरीव गुंतवणुकीच्या संधी यांचा प्रचार व प्रसार करून त्याद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र हे भारतामधील आर्थिकदृष्ट्या प्रबळ राज्य म्हणून ओळखले जात असून व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, विस्तृत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि अनुकूल भौगोलिक स्थान यामुळे आयटी उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. गुंतवणूक आणि नाविन्यतेसाठी पूरक व सक्षम व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध आहे.

देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी, राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ, कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम सहभागींना महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल.महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या, सर्व उद्योजक, गुंतवणूकदार व कॉर्पोरेट हाऊसेस यांना महत्त्वपूर्ण अशा संवादात्मक कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती उद्योग संचालनालयामार्फत देण्यात आली आहे.

Check Also

आता सहा महिने नोकरी करणाऱ्यांनाही ईपीएसमधून निधी काढता येणार ईपीएस निधीच्या नियमात बदल

केंद्राने शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएस EPS, १९९५ मध्ये बदल केला आहे, याची खात्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *