Marathi e-Batmya

पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा

मुंबई : प्रतिनिधी
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल ११ हजार ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेने हा घोटाळा आणि अनधिकृत व्यवहारांचा शोध लावला आहे. हे व्यवहार बँकेच्या मुंबईतील शाखेतून झाले असून बँकेकडून बुधवारी असे व्यवहार झाल्याची माहिती उघडकीस आणली. या वृत्तानंतर शेअर बाजारातील पीएनबीचे शेअर्स ५.७ टक्क्यांनी कोसळला.
मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत बँकेने म्हटले की, हे अनधिकृत व्यवहार काही ठरावीक खातेदारांना फायदा होण्यासाठी केले होते. त्याचबरोबर या व्यवहारांच्या आधारे इतर दुसऱ्या बँकांनी या ग्राहकांना परदेशात आगाऊ रकमाही हस्तांतरीत केल्या आहेत. दरम्यान, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने उघड केलेली नाहीत. मात्र या घोटाळ्याची माहिती संबधित तपास यंत्रणांना दिल्याचे बँकेने सांगितले आहे.

Exit mobile version