Breaking News

आरआर काबेलचा आयपीओ १३ सप्टेंबरला उघडणार आयपीओच्या माध्यमातून १,००० कोटी रूपये उभारणार

वायर आणि केबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आरआर काबेलचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदार आयपीओसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. कंपनी आयपीओद्वारे १,००० कोटी रुपये उभारू शकते. आरआर काबेल २६ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. ऑगस्ट महिन्यात शेअर बाजार नियामक सेबीने कंपनीला आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी दिली.

आयपीओ १२ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी १०.८ कोटी शेअर्स राखीव ठेवले आहेत. त्यांना सवलतीच्या दरात शेअर्स दिलेले जातील. आरआर काबेल आयपीओमध्ये १८० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. तर कंपनीचे प्रवर्तक आणि तिचे गुंतवणूकदार टीपीजी ऑफर फॉर सेल अंतर्गत १.७२ कोटी शेअर्स विकतील. अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म TPG Asia ऑफर फॉर सेलमध्ये सुमारे १.२९ कोटी शेअर्स विकणार आहे. सेबीकडे दाखल केलेल्या मसुद्यानुसार, TPG Asia ची कंपनीत १६.६७ टक्के हिस्सेदारी आहे.

कंपनीमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी सुमारे ६६.४२ टक्के आहे. तर ३३.५८ टक्के सार्वजनिक शेअर होल्डिंग आहे. यामध्ये TPG देखील समाविष्ट आहे. आयपीओमध्ये उभारलेल्या रकमेपैकी कंपनी १३६ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करेल. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. २८ ऑगस्टपर्यंत कंपनीकडे ७७७.३ कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते.

आरआर काबेल ही विद्युत क्षेत्रातील दिग्गज कंपनी आरआर ग्लोबलची उपकंपनी आहे. कंपनीची जवळपास ९० देशांमध्ये उपस्थिती आहे. वायर आणि केबल्स व्यतिरिक्त कंपनी इलेक्ट्रिकल वस्तू देखील बनवते ज्यामध्ये पंखे, लाइट स्विच यांचा समावेश आहे. ७१ टक्के महसूल वायर आणि केबलमधून येतो. मार्च २०२३ पर्यंत ५ टक्के वाटा असलेली आरआर काबेल ही वायर आणि केबल क्षेत्रातील पाचवी सर्वात मोठी कंपनी आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ५५९९ कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २७.६६ टक्के अधिक आहे. तर नफा १८९.९ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत महसूल २९.१ टक्क्यांनी वाढून १५९७.३ कोटी रुपये झाला आहे. तर नफ्यात ३१० टक्क्यांनी वाढ होऊन तो ७४.३ कोटी रुपये झाला आहे.

Check Also

आरबीआयने चारूलता कार आणि अर्नब चौधरी यांची ईडी म्हणून नियुक्त एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ जुलै रोजी चारुलता कार आणि अर्नब चौधरी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *