प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, महापालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांची दादागिरी विरोधी पक्षातील काँग्रेसशी दुजाभाव पण समाजवादी पक्ष, MIM व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) नगरसेवकांना भरीव निधी, भाजपाचे या पक्षांशी काय हितसंबंध?
मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकासनिधी वाटप हे सर्व नगरसेवकांना समान प्रमाणात झाले पाहिजे पण बीएमसीतील सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची अवघ्या काही लाखात बोळवण करण्यात आलेली आहे. महापालिकेतील पैसा भाजपा शिंदेसेनेच्या पक्षाचा निधी नाही तो मुंबईकरांचा पैसा …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गायमुख ते छत्रपती शिवाजी चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती पुढील आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ९.७ कि.मी. अंतराच्या मेट्रोची निविदा प्रक्रिया
ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या महत्त्वाच्या जोडणी नंतर पुढील आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ९.७ कि.मी. अंतराच्या उन्नत मेट्रो प्रकल्पाची निविदा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प
मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद
दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) ३९ व्या दीक्षांत समारंभाची शानदार सांगता १०० विद्यार्थी, त्यांच्या कुटुंबीयांसह आणि इतर ओळखीच्या व्यक्तींसह उपस्थित
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) मुंबई प्रादेशिक केंद्राचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज अत्यंत सन्माननीय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील राजीव गांधी सेंटर, केम सभागृह येथे आयोजित ३९ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. या समारंभाचे विशेष अतिथी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. …
Read More »पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर सुधारीत कार्यक्रमानुसार १५ ते ३० एप्रिल कालावधीत होणार चाचणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईतील कोळीवाडा आणि गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्या मुंबईचा प्रश्न लोकसभेत केला उपस्थित
मुंबईचे मूळ रहिवाशी कोळी बांधवांच्या कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाचा प्रश्न गंभीर असून खार दांडा येथील इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. ज्यांना घरे बांधायची आहेत, त्यांना तातडीने परवानगी मिळाली पाहिजे. मुंबईतील कोळीवाडा आणि गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. खासदार प्रा. …
Read More »तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या
१ एप्रिलपासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र तत्पूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर आयएएस अधिकाऱ्यांमधील काही जण सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी इतर आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये दिव्यांग विभागाचे …
Read More »
Marathi e-Batmya