Breaking News

दोन लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनेवरून बदलापूरकर आक्रमक; रेल रोको आंदोलन सकाळपासून सुरु झालेले आंदोलन संध्याकाळ होत आली तरी सुरुच

दोन लहान शाळकरी मुलींवर शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेवरून आज बदलापूरकर चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असली आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीवरून बदलापूर रहिवाशी आक्रमक झाले. सुरुवातीला आंदोलक जमावाने ज्या शाळेत हि घटना घडली, त्या शाळेसमोर आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. या घटनेमुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण बदलापूर आज बंद ठेवण्यात आले.

मात्र पोलिसांनी शाळेसमोर एक कडे करून आंदोलकांना रोखून धरले. त्यानंतर काही आंदोलकांनी थेट बदलापूर रेल्वे स्थानकानात जात कल्याण आणि कर्ज-खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे सकाळपासून मुंबईत येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आणि लोकलसेवेवर परिणाम झाला. तसेच मुंबईबाहेरून येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या कर्जत-खोपोलीतच थांबविण्यात आल्या तर मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या अंबरनाथ पर्यत लोकलसेवा चालविण्यात येत होत्या.

दरम्यानच्या काळात पोलिसांकडून आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम रहात आरोपीला फाशी द्या या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांच्या चर्चेला अपयश आले, दुपारनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलकांना हुसकाविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना माघारी फिरावे लागले.

पुन्हा आंदोलक आक्रमक होत, फाशी, फाशी अशा घोषणा देत रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून बसले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी शांत रहात शिष्टमंडळासोबत चर्चेची तयारी दर्शविली. मात्र आंदोलक हे कोणत्याही संघटनेचे किंवा राजकिय पक्षाशी संलग्न नसल्याने आंदोलकांनी जी चर्चा करायची आहे ती इथे सर्वासोबत करा अशी मागणी केली.

या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात आले होते. परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम रहात रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास नकार दिला.

Check Also

वांद्रे पश्चिम येथे उभ्या राहणाऱ्या “बॉलीवूड थिम” चे भूमीपूजन भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांच्या हस्ते कार्यक्रम

वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २ बी च्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *