Marathi e-Batmya

ठाण्यात बिर्याणी फेस्टीवल

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यात २३ ते २५ फेब्रुवारी असे तीन दिवसीय बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंन्टस व टॅग या ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या संस्थेच्यावतीने बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणार आहे. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी अशा बिर्याणीच्या प्रसिध्द ब्रॅन्डच्या बिर्याणीबरोबर व्हेज व नॉनव्हेज बिर्याणी या फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. जवळपास १५ विविध प्रकारच्या बिर्याणीची चव येथे उपलब्ध असणार आहे. शाकाहारींसाठी व्हेज बिर्याणी देखील उपलब्ध असणार आहे.

ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात २३ ते २५ फेब्रुवारी काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळी बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होणार आहे. तर शनिवार व रविवारी संध्याकाळी ५ ते सायंकाळी ११ वाजेपर्यंत फेस्टीवल सुरू राहणार आहे. खवय्याना बिर्याणीचा आस्वाद फेस्टीवलच्या ठिकाणीही घेता येणार असून पार्सलची देखील सोय उपलब्ध असणार आहे. बिर्याणीबरोबर विविध प्रकारचे स्टार्टस.कबाबचे अनेक प्रकार देखील फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत.  फेस्टीवलच्या ठिकाणी रोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार असून लाईव्ह म्युझिक, शाम ए गजल हा मुशायरा या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 

Exit mobile version