Breaking News

गणेशोत्सवात मुंबईतील या १२ पुलांवर अती गर्दीस मुंबई पालिकेचा मज्जाव मंडळांना मिरवणूकीसह गणेशविसर्जनासाठी रहदारीस बॅन

गणेशोत्सवास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाच मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळासाठी शहरातील १२ पुलांवरून गर्दी करण्यास आणि मिरवणूका, गणेश विसर्जनासाठी वापरू नये असे आवाहन केले आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भाविकांना मिरवणुका काढताना मुंबईतील १२ पुलांवर जमू नये, असेही जाहिर केले आहे.

दक्षिण मुंबईतील दादर आणि चर्चगेट आणि सीएसएमटी दरम्यान १२ पूल आहेत. मुंबई महापालिकेने BMC ने लोकांना जास्त गर्दी टाळण्यास सांगण्याची ही पाचवी वेळ आहे. गेल्या वर्षीपर्यंत महापालिकेने १३ पुलांची यादी केली होती. यावर्षी घाटकोपरमधील एक पूल दुरुस्तीसाठीच्या यादीतून बाहेर काढण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या पुलांच्या यादीत करी रोड, आर्थर रोड, चिंचपोकळी, भायखळा, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, फॉकलंड, केनेडी, फ्रेंच, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि दादर येथील पुलांवर जास्त गर्दी करू नये असे मुंबई महापालिकेने केले आहे.

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की हे पूल “जीर्ण अवस्थेत” नाहीत. “तथापि, उत्सवादरम्यान, लोक ट्रकवर मूर्ती घेऊन जातात ज्यात भक्तांच्या मिरवणुक देखील असते. अशा परिस्थितीत, या पुलांवर वजन खूप जास्त होते, त्यामुळे या पूलांवर जास्त गर्दी करू नये असे आवाहनही यावेळी केले.

यातील बहुतांश पूल शतकानुशतके जुने आहेत, त्यामुळे भाविकांनी त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुलांवर जास्तीत जास्त १६ टन क्षमतेची मर्यादा असणे आवश्यक आहे, असेही अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *