Breaking News

मुंबई

जून्या व मोडकळीस इमारतींच्या पुर्नविकासासाठी अधिनियमात दुरूस्ती म्हाडाची नियोजन प्राधिकारी नियुक्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गम‍ित करण्यासह म्हाडा अध‍िन‍ियम १९७६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास तसेच उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला नियोजन प्राध‍िकारी म्हणून घोष‍ित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारती तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण …

Read More »

ठाणे महापालिकेतील पीएफ घोटाळयाची चौकशी करा आ. आव्हाड यांची मागणी

ठाणेः प्रतिनिधी ठाणे महानगर पालिकेने साफ सफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आणत सदर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या कंत्राटदारांनी पीएफ (भविष्य निर्वाह निधी) चे पैसे भरल्याच्या पावत्या जमा केल्याशिवाय त्यांना देयके दिली जाऊ नयेत, असा नियम …

Read More »

भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अहवाल पाठविण्याचे नगरविकास विभागाला आदेश लोकायुक्त कार्यालयाचे नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांना आदेश

मुंबईः प्रतिनिधी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता कुंदन पाटील यांच्याकडून कायम सेवेत समावून घेण्यासाठी ७ लाख ५० हजार रूपये घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश लोकायुक्त कार्यालयाने नगरविकास विभागाला दिले. यासंदर्भात लोकायुक्त कार्यालयाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना …

Read More »

आयोजकांनो दहीहंडीच्या खर्चापेक्षा पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी दहीहंडी उत्सव साजरा न करता या उत्सवाला येणारा खर्च पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांना केले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कोकणामध्ये पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. येथील पूरग्रस्तांना …

Read More »

मध्य- हार्बर रेल्वे सेवा ठप्प सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची रेल्वे प्रशासनाकडून माहिती

मुंबईः प्रतिनिधी मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला असून कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले …

Read More »

मुंबई उपनगरवासिंयांना पावसाने घरात कोंडले शुक्रवारी रात्रीपासून सततच्या मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच

मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-विरारः प्रतिनिधी मुंबईसह उपनगरांतील कल्याण, डोंबिवली, विरार, वसई आणि नवी मुंबई परिसरात पावसाची जोरात बॅटिंग सुरु आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होवू लागल्याने उपगनरात राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांना अक्षरक्ष घरात कोंडल्याची परिस्थिती पाह्यला मिळाली. तसेच मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील अनेक लोकल गाड्या …

Read More »

२६,२७ जुलैला पावसामुळे परिक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेर परिक्षा होणार शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड आशिष शेलार यांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी 26 व 27 ऑगस्ट दरम्यान बदलापूर, कर्जत या भागात संततधार पावसामुळे वाहतूक कोंडीमुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. त्यामधे दहावी, विज्ञान भाग 2, इतिहास, समाजशास्त्र 12 वी समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी ज्या परिक्षांना बसता आले नाही अशा या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसातील परीक्षेचे पेपर ही …

Read More »

मुंबईतली वाहने म्हणणार DK : मरते दम तकची आठवण करून देणार नवी सीरीज करत असल्याची परिवहन विभागाची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात चारचाकी वाहनांसाठी DK ( डिके ) ही नवी सीरीज सुरू करण्यात येत असून डॉयलॉग किंग राजकुमार आणि स्व. अभिनेते ओमपुरी यांच्या मरते दम तक हिंदी चित्रपटातील डॉयलॉगच्या धर्तीवर ही सीरीज सुरू करण्यात येत असल्याची चर्चा परिवहन विभागात सुरु आहे. हिंदीतील सुपर हीट …

Read More »

आणि सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला पावसाच्या उघडपीने चाकरमान्यांना दिलासा

मुंबईः प्रतिनिधी मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळी १०.३० वाजल्यानंतर उघडीप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरातून कामावर तरी जावू देतो की नाही म्हणून विचार करणाऱ्या चाकरमान्यांना या उघडपीने चांगलाच दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा,विक्रोळी, अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरूच होती. …

Read More »

मुंबईच्या उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या तिन्ही मार्गास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी 9.209 किमी आहे. यापैकी 8.529 किमी उन्नत तर 0.68 किमी भुयारी मार्ग आहे. …

Read More »