Breaking News

मुंबई

नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांसाठी अभय योजना पाणीपट्टीच्या थकीत बिलावरील व्याज माफ

मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित …

Read More »

आता शाळांमध्ये डब्‍बेवाल्‍यांचे डबे? पोलीस आयुक्‍त आणि शिक्षण उपसंचालकांनी तातडीने संयुक्‍त बैठक घेण्याचे मुख्‍यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली असली तरी डबेवाल्‍यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्‍यांचे महत्‍व लक्षात घेता ही बंदी अयोग्‍य असून मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्‍यांनी मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने याबाबत संयुक्‍त बैठक …

Read More »

मिरा भाईंदरमधील ५३८ कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देणार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांचे आश्वासन

मीरा-भाईंदरः प्रतिनिधी मिरा भाईंदर महानगरपालिकेतील आस्थापनेवरील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देण्यसाठी शासनास भाग पाडू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी नगरभवन येथे केले. यावेळी सरचिटणीस प्रकाश बने, सह सचिव वरेश कमाने, कोषाध्यक्ष मुंबई मार्तंड द्राक्षे, आरोग्य विभाग संघटनेचे सचिव बाबाराम …

Read More »

मध्य रेल्वेने ३.३७ कोटी खर्च तर केले पण अहवाल महत्वाचा एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षेवरील खर्चावरील अहवालाची प्रतिक्षा

मुंबईः प्रतिनिधी मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असून यावर्षीही आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या ऑडिटनंतर सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वे प्रशासनाने एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर रुपये ३.३७ कोटी खर्च केले. आरटीआय कार्यकर्ते …

Read More »

प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार निदर्शने शहिदांना शाप आणि सईद हाफिजला उ:शाप; हीच भाजपची नीती- आ. आव्हाड

ठाणे: प्रतिनिधी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रज्ञासिंग ठाकूर यांना साध्वी म्हणणे म्हणजे संतत्वाचा अवमान आहे. जर प्रज्ञासिंग हिच्या शापाने करकरे यांचा मृत्यू होत असेल तर सईद हाफीजला त्यांचा …

Read More »

मोदींचे कार्टून, मोदी, मल्ल्या यांच्या छायाचित्रांमुळे प्रचार फिल्मला परवानगी नाकारली ! निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा अन्यथा प्रचार थांबवणार: आव्हाड यांचा इशारा

ठाणे : प्रतिनिधी नरेंद्र मोदीसारखे कार्टून दिसते, निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे छायाचित्र असल्याने मिडिया सेंटरचे सेक्रेटरी मिलिंद दुसाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार फिल्मला परवानगी नाकारण्याची माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याप्रश्नी २४ तासात हस्तक्षेप करावा अशी मागणी करत न्याय द्यावा अन्यथा निवडणूकीचा प्रचार थांबवू …

Read More »

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि …

Read More »

वसई-विरार महानगरपालिकेतील अखेर ती २९ गावे अखेर शासनाने वगळली माजी आमदार विवेक पंडीत यांच्या लढ्याला यश

मुंबई: प्रतिनिधी अनेक वर्ष वसई-विरार महानगरपालिकेतून बळजबरीने लोकांच्या मताविरुद्ध सामील केल्या गेलेल्या २९ गावांना वगळावे याकरिता विविध स्तरांवर लढा, आंदोलने केली गेली. तसेच या मागणीकरिता प्रदीर्घ न्यायालयीन लढा ही उभा केला गेला. या पार्श्वभूमीवर २९ गावांना महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. गावे वगळल्याच्या निर्णयाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्य शासनाने …

Read More »

पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे मात्र कपिल पाटलांना विरोध कायम - सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे

भिवंडीः प्रतिनिधी भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष …

Read More »

होर्डींग्जसाठी ५ लाखांचा हप्ता घेणारा ‘अविचारी’ खासदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ठाणे : प्रतिनिधी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डींग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र, ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने या होर्डींग्जच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या …

Read More »