Breaking News

मुंबई

मुंबईत रेल्वे विकासाची ६५ हजार कोटींची कामे सुरु तर महाराष्ट्रात ७० हजार कोटींची रेल्वे विकासाची कामे

नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या विविध  प्रकल्पांसाठी १ लाख ३५ हजार ५७ कोटी रुपयांची कामे गेल्या चार वर्षात हाती घेण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक कामे एकट्या मुंबईत रेल्वे विकासासाठी ६५ हजार ७२४ कोटी रुपयांची कामे ही एम.यू.टी. पी. अंतर्गत करण्यात येत आहेत. या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग, दुपदरीकरण, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण याबरोबरच …

Read More »

म्हणे उद्योगपतींनी काय कँमेरेवाल्यांची पाठ पहायची का? मँग्नेटीक महाराष्ट्र उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फक्त दूरदर्शन, एएनआयवरच

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र कन्वर्जन्स-२०१८ चे उद्घाटन उद्या रविवारी १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावरील उद्योगपती हजर राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाला खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना परवानगी …

Read More »

२० लाख एलईडी दिव्यांनी उजळणार राज्यातील रस्ते ईईएसएलसोबत आज होणार सांमज्यस करार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या वीज बीलाच्या रकमेत बचत होण्याकरीता राज्याच्या ऊर्जा विभागाकडून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने शहर, तालुका आणि जिल्ह्यातंर्गत रस्त्यांवर तब्बल २० लाख एलईडीच्या दिवे बसविण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईईएसएल आणि ऊर्जा विभागा दरम्यान आज बुधवारी …

Read More »

मुंबईतील शासकिय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नी शिवसेना सरसावली आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी शहरातील शासकिय जमिनीच्यावर उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनी करून पुर्नविकास करण्यासाठी घातलेल्या अटींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गुरूवारी १५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली. संपूर्ण मुंबई उपनगरात महाराष्ट्र शासनाने …

Read More »

पनवेलकरांवर घोटाळेबाज आयुक्त लादण्याचा प्रयत्न ? आयुक्त डॉ. शिंदे यांच्याऐवजी घरत यांच्या नियुक्तीचा घाट

पनवेल : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या गाजलेल्या इंजिन घोटाळ्यात संशयाच्या भोवऱ्यात असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान करण्याच्या भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. घरत हे रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांच्यासाठी भाजपाने पायघड्या घालून चव्हाणांची तळी उचलण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे येत …

Read More »

न्यायालयाने आदेश देवूनही रंगशारदा प्रतिष्ठानवर सरकारची मेहरनजर १३ वर्षे झाली तरी सरकारकडून चौकशी नाहीच

मुंबई: प्रतिनिधी नाटयमंदिर बांधण्यासा म्हाडाने दिलेल्या भूखंडावर हॉटेल आणि अन्य व्यवसायिक वापर करणाऱ्या रंगशारदा प्रतिष्ठानाच्या अनियमितताबाबत चौकशीचा प्रस्ताव शासनाने लटकविला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस म्हाडाने दिलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात १३ वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाने भाडेपट्टा करारनामा रद्द करणेबाबत आदेश देत उपाध्यक्ष किंवा मुख्य …

Read More »

हर्षल रावतेच्या आत्महत्या प्रकरणानंतर सरकारला आली जाग अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मंत्रालयात बसवली जाळी

मुंबई : प्रतिनिधी गेली महिनाभर मंत्रालयात येवून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मंत्रालयातील आवारात उडी मारून आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा निर्णय घेत त्याची प्रशासनाने अंमलबजावणीही केली. धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अहमदनगरचा अविनाश शेटे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा …

Read More »

भाडेपट्ट्याच्या शासकीय जमिनींचा भाडेपट्टा दर लवकरच कमी करणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींवरील गृहनिर्माण सोसायट्या, विश्वस्त संस्था व इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टा दर कमी करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना देत नागरी क्षेत्रातील अकृषिक कर हा रेडिरेकरनच्या ३ टक्के वरून ०.०५ टक्के …

Read More »

आणि राज्य सरकारची वेबसाईट क्रँश झाली लाखो नागरीकांची झाली निराशा

मुंबई : प्रतिनिधी डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यात महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण निर्णयाची माहिती पोचविणारे राज्य सरकारच्या मालकीचे महाराष्ट्र हे संकेतस्थळ क्रँश झाले. त्यामुळे राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळावर धाव घेणाऱ्या लाखो नागरीकांची मोठी निराशा झाल्याने नागरींकामध्ये नाराजी निर्माण झाली. राज्य सरकारच्या जवळपास ३६ विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी …

Read More »

अखेर मंत्रालयातील त्या तरूणाचा मृत्यू उचपार नेण्यापूर्वीच मृत्यू झाला

मुंबई: प्रतिनिधी न्यायासाठी मंत्रालयात आलेल्या हर्षल रावते या तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तातडीने पोलिसांनी त्याला सीएसटी जवळील सेंट जॉर्ज रूग्णालयात नेले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान सदर हर्षल रावते हा एका खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो पँरोलवर सुटून आलेला होता. मात्र …

Read More »