Breaking News

मुंबई

मोजो आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश संबधितांवर कठोर कारवाई करणार

मुंबई : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोअर परळ येथील कमला मिल आवारातील आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या सदर आग प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत याप्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. आज पहाटे …

Read More »

मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू अग्निरोधक यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई : प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊडमध्ये हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू तर १४  जखमी झाले असून सर्वांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की  तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर …

Read More »

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील कारवाईला मुहूर्त मिळेना ३३ एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्यातील महापालिका अभियंता धिवर गायब

मुंबईः प्रतिनिधी शहरातील एसआरएच्या ३३ एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील कारवाईचा चेंडू गृहनिर्माण विभागाने एसआरएच्या आखत्यारीत टाकल्याने त्यांच्यावरील कारवाईला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. झोपडीपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या मंजूरीत अनियमितता केल्याप्रकरणी एसआरएचे माजी मुख्याधिकारी तथा माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर …

Read More »

मुंबईतील आदीवासी पाडे, कोळीवाड्यातील झोपड्यांचे लवकरच पुर्नवसन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे आश्वासन

नागपुर : प्रतिनिधी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदीवासी पाडे, वन विभागाच्या जागेवरील झोपड्या, कोळीवाड्यांतील झोपड्यांचे लवकरच पुर्नवसन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या घरांची दुरूत्ती व कामाचा दर्जा याप्रश्नासह दामू नगरचे पुनर्वसनच्या प्रश्नावर राज्याचे वनमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री …

Read More »

ओखी वादळग्रस्तांना पंचनाम्यानंतर मदत देणार मदत जाहीर करण्यास सरकारची चालढकल

नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा, काजू आणि मच्छिमार उत्पादकांचे नुकसान झाले. या वादळग्रस्तांना राष्ट्रीय आप्तकालीन परिस्थिती अर्थात एनडीआरएफमध्ये येत नसल्याने या विभागातून नुकसान भरपाई देता येणार नाही. मात्र पंचनामे करून एसडीआरएफ अर्थात राज्य आपतकालीन परिस्थितीतून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगत नेमकी किती नुकसान भरपाई देणार …

Read More »

वांद्रे येथील शासकिय घरे मालकी हक्काने देण्याबाबत सरकारकडून चालढकल मुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्याचे सा.बां.मंत्री पाटील यांचे उत्तर

नागपुर : प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील शासकिय वसाहतीतील घरे सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देण्याबाबत मी व्यक्तीश: सकारात्मक आहे. मात्र हा निर्णय मोठा असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतरच याविषयी अधिक बोलणे योग्य होणार असल्याचे गोलमाल उत्तर सार्वजनिक बांधकांम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोडकळीस …

Read More »

मुंबईसह राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळणार संरक्षण पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आश्वासन

नागपूर : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, एमएमआर क्षेत्रातील आणि राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे असे निर्देश ता‍तडीने सर्व महापालिकांना देणार असल्याचे सांगत रेल्वे हद्दीतील विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनाही लवकरच कळ‍वण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याचतबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या …

Read More »

सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय हलवणार रेल्वेमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत चर्चा

जागतिक वारसा लाभलेल्या सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय इतरत्र हलवण्यात येणार आहे. रेल्वेचे मुख्यालय हलवून ही ऐतिहासिक इमारत जागतिक रेल्वेचे संग्रालय( म्यूझियम) म्हणून नावारुपास येईल. रेल्वेमंत्र्यांच्या २९ नोव्हेंबरच्या मुंबई दौऱ्यात या विषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, काही तज्ज्ञांनी या इमारतीचे रेल्वे म्यूझीयममध्ये रुपांतर करण्यास विरोध दर्शविला आहे. तरीही या इमारतीमधून …

Read More »