Breaking News

या लोकल रद्द झाल्यानंतर सार्वजनिक वाहनांना प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत परिवहन विभागाचा निर्णय

मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी ३० मे रोजी मध्यरात्रीपासून २ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे लोकल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच दुपार नंतरच्या अनेक लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्या. तसेच प्रवाश्यांची गैरसोयही झाली. अखेर सर्वसामान्य जनतेची ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

रद्द झालेल्या लोकल रेल्वे सेवाः-

४ वाजून ५० मिनिटांची (ठाणे – अंबरनाथ)

४ वाजून ५४ मिनिटांची (कुर्ला – कल्याण)

४ वाजून ३० मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)

४ वाजून ३८ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)

५ वाजून ८ मिनिटांची (सीएसएमटी – डोंबिवली)

५ वाजून ३० मिनिटांची (दादर – कल्याण)

५ वाजून २४ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)

६ वाजून १५ मिनिटांची (विद्याविहार – कल्याण)

५ वाजून ५७ मिनिटांची (सीएसएमटी – डोंबिवली)

६ वाजून १५ मिनिटांची (परळ – कल्याण)

६ वाजून ३ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)

६ वाजून २२ मिनिटांची (सीएसएमटी – कुर्ला)

६ वाजून ३७ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)

७ वाजून ८ मिनिटांची (परळ – कल्याण)

६ वाजून ५७ मिनिटांची (सीएसएमटी – अंबरनाथ)

७ वाजून १८ मिनिटांची (सीएसएमटी – कल्याण)

७ वाजून २९ मिनिटांची (सीएसएमटी – कल्याण)

८ वाजून ५९ मिनिटांची (परळ – कल्याण )

८ वाजून ५२ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे )

९ वाजून १२ मिनिटांची (सीएसएमटी – डोंबिवली)

९ वाजून ५४ मिनिटांची (सीएसएमटी – कल्याण)

९ वाजून ५६ मिनिटांची (सीएसएमटी – कुर्ला )

१० वाजून ५४ मिनिटांची (सीएसएमटी – कुर्ला )

११ वाजून ५५ मिनिटांची (सीएसएमटी – ठाणे)

Check Also

राज ठाकरे यांचे आवाहन, जातीपतीचे विष कालवणाऱ्यांना दूर करा मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आवाहन

विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास अद्याप तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभआ निवडणूकीत लागलेल्या निकालाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *