Breaking News

बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाचा विरोध आदित्य ठाकरे यांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र

मुंबईतील मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्ट बसकडून दर भाडेवाढीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या अनुषंगाने बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाने विरोध केला असून मुंबईतील बस सेवा पुन्हा एकदा कोलमडून पडण्याच्या स्थिती असल्याचे सांगत मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि बेस्टला आर्थिक निधी द्यावा यासाठी शिवेसना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून बेस्ट भाडेवाढ करू नये अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे बेस्ट रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन मानली जाते. बेस्टच्या बिकट स्थितीवर बेस्टने महापालिका प्रशासनाकडे मदत मागितली होती. जे देण्यास महापालिकेने नकार दिला होता, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. केवळ आधीच ठरलेली ८५० कोटी रुपयांची मदत बेस्टला दिली जाईल.

महापालिकेकडे आहे बेस्टच्या वातानुकूलित बसचे भाडे केवळ सहा रुपये असेल, अशी सूचना बेस्टला करण्यात आली. आणि सामान्य भाडे फक्त ५ रुपये आहे. हे भाडे ५ किमी अंतरासाठी आहे. आहे. देशातील सर्वात कमी भाडे वाहतूक सेवा आहे.

आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या दुरवस्थेवरून आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आयुक्तांना दिलेल्या पत्रात डॉ मुंबईतील प्रदूषण थांबवून इंधन वाचवायचे आहे, असे पत्रात म्हटले आहे.

बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस उपक्रम सुरू करण्याच्या शिवसेनेच्या पुढाकाराने समाधानी आहे पण दोन वर्षांत ‘बेस्ट’ची इलेक्ट्रिक पॉवर बसेसच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी भीती व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी या मागण्या केल्याः-

– महापालिकेने ‘बेस्ट’ला आर्थिक मदत करावी.
– ‘बेस्ट’चे भाडे वाढू नये.
-कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शन वेळेवर मिळावी.
– बसेसची संख्या तातडीने वाढवावी.
– ‘बेस्ट’ला आर्थिक संकटातून बाहेर काढावे.

Check Also

आदित्य ठाकरे यांची टीका, ईसी म्हणजे एनटायरली कॉम्प्रमाईस अनिल परब यांचा आरोप, १९ व्या फेरीनंजर मतमोजणीची प्रक्रिया डावलली

मुंबईतील उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाल्यानंतर या निकालावरून शिवसेना शिंदे गटाकडून आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *