Breaking News

उद्धव ठाकरे यांचा टोला, आजचं आंदोलन हे विकृत विरूध्द संस्कृती… भरपावसात बदलापूरप्रश्नी शिवसेना उबाठाची सरकारच्या विरोधात निदर्शने

बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी स्थानिक बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात जनप्रक्षोभ बाहेर आला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यास अटकाव केला. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात काळ्याफिती आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनजवळ काळी फित आणि काळा झेंडा लावून आंदोलन केले. यावेळी सकाळपासूनच हजेरी लावलेल्या भर पावसातही डोक्यावर छत्री न घेता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत राज्य सरकारवर टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जरी या बंदला तुम्ही बंदी केली तरी आज महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या घरात ह्या अत्याचाराच्या विरोधात मशाल धगधगतेय, स्त्रीयांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा आमच्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. तो नंतर मंजूरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता. आज देशाच्या राष्ट्रपतीही महिला आहेत. त्यांनी जरा हा शक्ती कायदा तुमच्या कार्यालयात कोठे पडला असेल तर त्यावरील धुळ झटकावी आणि त्या कायद्याला मंजूरी द्यावी अशी विनंती करत तो शक्ती कायदा अंमलात आणावा असेही अशी मागणीही यावेळी केली.

या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेक नेते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक सहभागी झाले होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारमध्ये बसलेल्यांची फक्त बोलायची हिंमत आहे, मात्र त्यांच्यात सामोरे जाण्याची हिंमत नाही. गुन्हेगारांना पाठीशी घालतायतं. नार्ढावलेले सरकार आपल्यावर राज्य करतंय अशी टीका करत हे सरकार निर्लज्जपणे वागतय, ह्या सरकारला घालवावचं लागतंय, आपल्या बहिणींची सुरक्षा करावीच लागले. आजचं आंदोलन हे विकृत विरूद्ध संस्कृतीचं आहे. आजचा बंद हे कडकडीत झाला असता असेही यावेळी सांगितले.

राज्य सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आपण सर्वांनी पाह्यलं असेल की, न्यायपालिका तत्पर असते. आपण दाखल केलेल्या याचिकेवरही न्यायालय अशीच तत्परता कधी ना कधी दाखवेल असे सांगत आम्हाला विश्वास आहे, निकाल आपल्या बाजूने लागले. या सरकारच्या विरोधात जेव्हाही काही होणार असंत तेव्हा सरकारचे सदाआवडते लोक आणि चेलेचपाटे लोक न्यायालयात जात सरकारला मदत करतात, अशी खोचक टीकाही अॅड सदावर्ते यांचे नाव घेता केली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, हे आंदोलन फक्त एका दिवसाचे नाही तर सर्व शिवसैनिक त्यांच्या गावात, मुख्य चौकात जाऊन सरकारच्या विरोधात आणि शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवा असे आवाहनही यावेळी केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *