Breaking News

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.

याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले.

दरम्यान, अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरण्याबाबत यापूर्वीही महिला व बाल विकास मंत्र्यांंकडून घोषणा करण्यात आली होती. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अंगणवाडी महिलांच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनावेळीही यासंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र त्यास जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आली असून त्यावर अद्याप कोणतीच कारवाही झाली नाही. आता आदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. किमान सरकारचा कालावधी पूर्ण होण्यास आता दोन-तीन महिन्याचा कालवाधी शिल्लक राहिलेला असताना आता तरी या रिक्त जागा खऱेच भरणार का असा सवाल बेरोजगार महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *