Breaking News

आदित्य ठाकरे यांचा सवाल, एमपीसीबी काय साध्य करू इच्छिते… फडणवीस प्रत्येक गोष्ट शुगर कोटिंग करून सांगतात

‘आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत. ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला.

मर्सिडीज बेन्ज प्रकल्पावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नुकतीच धाड टाकली. तसेच प्रदुषण होत असल्याचा ठपका ठेवला. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीला पत्र लिहिलं. या पत्रातून मर्सिडीझ बेन्झने पर्यावरणाचा नेमका कसा ऱ्हास केला आहे? त्यांनी नेमकं काय केलं आहे? असा सवाल विचारत तसेच त्यांनी कंपनीला निव्वळ भेट दिली होती की ती धाड होती? त्यांच्यावर नेमका किती दंड आकारण्यात आला आहे? असा सवालही उपस्थित करत यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी केली.

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक केलीय – आदित्य ठाकरे

केंद्र सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की लोकांच्या पुढ्यात सरकारने धूळ फेक केली. ग्लोबल इकॉनॉमी हब economic hub बनवायचं असेल तर इतका वेळ का लागतो आहे ? इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर international financial center हे मुंबईला द्या.., गिफ्ट सिटी तुम्ही महाराष्ट्र बाहेर म्हणजेच गुजरातला नेली. पण आता गिफ्ट सिटीचे मुंबईत उदो उदो केल जातय, पण मुंबईचे नाव घेतले जात नाही. यात भाजपा काय साध्य करू पाहते ? तरुण तरुणी अनेक जण नोकऱ्या नाहीत म्हणून आणि बेरोजगार आहेत म्हणून आंदोलन करत असल्याचेही यावेळी सांगितले.

पियूष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागावी -आदित्य ठाकरे

पियूष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी करत जर इंडस्ट्रीजवर अशी रेड पडत असेल तर याचा परिणाम केवळ मर्सिडीज बेंझवरच्या येथील कंपनीवर नाही होत तर, जर्मनी मध्ये असलेल्या या प्रमुख कंपनीवर परिणाम होतो याची दखल घ्यावी असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

Check Also

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *