Marathi e-Batmya

आदित्य ठाकरे यांची टीका, सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण

खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक आणि मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालीआहे . चाकरमानी कोकणात आता गणपतीला जातील. गडकरी यांना आवाहन आहे, त्यांनी एकदा एकदा गाडीने जावं. मग कळेल किती काम झालय. कारण मुंबई असो वा ठाणे रस्त्यावरचे खड्डे मोजावे की खड्ड्यात रस्ते शोधावे अशी स्थिती निर्माण झाली आहे अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.  आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत इशारा दिला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, १५ मे २०२३ रोजी मुंबईतील मेगा रस्ते घोटाळा सर्वांसमोर आणला होता. ‘आता जुलै २०२४ आहे, अजूनही काम झालेलं नाही . यात दक्षिण मुंबईतील कंत्राटदार याने काम केलं नाही म्हणून त्याला काढलं की ब्लॅक लिस्ट केलं ? दंड लावला तो वसुल केला का ? हा प्रश्न समोर येतोय . पण नोव्हेंबर मध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरच स्टॉप पेमेंट करणार आहोत, हे काम थांबवणार आहोत. ह्यावर्षी पुन्हा मिंधे-भाजपा सरकारने ६००० कोटींच्या वेगळ्या निविदा काढल्या आहेत . ह्यावेळीसुद्धा आवडत्या पाच कॉन्ट्रॅक्टर मित्रांची निवड केली आहे. रस्त्याचं काम होवो अगर न होवो, निधीत वाढ नक्की होतेय आणि काम मिंधे-भाजपा सरकारच्या आवडत्या मित्रांनाच मिळतंय’ अशी घणाघाती टीकाही यावेळी केली.

‘सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण !

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सरकारवर टीका करताना ‘बांद्रा वर्सोवा सी लिंकचे काम अजूनही सुरु झालेल नाही. लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम राज्यात सुरु आहे. काम होवो न होवो कॉन्ट्रॅक्टमध्ये कलेशन झालय. सरकारचे खोके, जनतेला धोके हे सध्यातरी धोरण सद्या सुरु आहे . पण दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याच काय झालं ? मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकर्णाच काम किती झालं ? हे आम्हाला महापलिकेने सांगाव अशी मागणी करत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मित्राला कंत्राट द्यायच म्हणून आपण हे सोसायच का? असा संतप्त सवालही यावेळी केला.

Exit mobile version