Breaking News

आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ

‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. आपण पुढचं सरकार कोणाचे निवडणार असा सवाल करत नाशिककर जनतेला युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी सवाल केला.

शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला आणि मनमाड येथे महाराष्ट्र स्वाभिमान मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

एमपीएससी MPSC च्या गोंधळावरून टीका

“पुण्यात एमपीएससी MPSC परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे . आपल्या राज्यात MPSC ने आडमुठी भूमिका घेतली आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेण्याचा हट्ट का ? का हा घोळ घालत आहात ? राज्य सरकार म्हणते आम्ही दखल घेतली आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्पर्धा परिक्षांच्या गोंधळावरून म्हणाले की, ‘किती शेतकऱ्यांना असे वाटते की पुढच्या पिढीने शेती करू नये ? परवडत नाही, पिकाला भाव नाही. नोकऱ्या यायला पाहिजेत, महाराष्ट्रात एक तरी नवा रोजगार आला आहे का ? स्पर्धा परीक्षांच्या घोळ प्रमाणे उद्योगांचे घोळ आहेत. आपले उद्योग गुजरातला चालले आहेत. इथली महिंद्रा कंपनी देखील बाहेर जाण्याचा विचार करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गेले की उपमुख्यमंत्री नाराज होतात. फक्त खोके घ्या अन खोके घ्या. थातूरमातूर म्हणून कुठे तरी सह्या करत असतात अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मिंधे सरकार यांची तुलना मी नेहमी करतो. आपण उद्योगांना सुवर्णकाळ आणला. कर्ज मुक्ती उद्धव साहेबांनी केली. फडणवीस यांनी कर्जमुक्तीची मोठी होर्डिंग्ज लावले, केवढ्या अटी शर्ती लावल्या. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच नागपूरात कर्जमाफी जाहीर केली. कोणतीही निवडणूक समोर नसताना शेतकऱ्यांची २ लाखांची कर्ज मुक्ती करून दाखवली. कोव्हिड मध्ये देखील जेवढी शक्य तेवढी मदत केली. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत हे मला लोक सांगतात. कांद्याची निर्यात बंदी केल्याचे आठवतं ना ? आधी गुजरातची निर्यात बंदी उठवली मग महाराष्ट्राची उठवली. महाराष्ट्राला थांबवण्याचा यांचा प्रयत्न असून ऑलिम्पिक साठी गुजरात मधून किती खेळाडू गेले हे बघा असे आव्हानही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सगळीकडे मुख्यमंत्री सांगतात सरकार आल्यानंतर लाडकी बहिण निधी वाढवून देऊ. पण १० वर्षानंतर १५ लाखनंतर १५०० वर आले आहेत अशी टीका करत निवडणुकीनंतर सरकार कमी करणार, पण घटना बाह्य सरकारने आत्ताच वाढीव निधी द्यावा असे थेट खोचक आव्हानही यावेळी दिले.

राजकीय आंदोलन होते हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ?

बदलापूरच्या संतापजनक घटनेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘लाडक्या बहिणीला पैसे नको आधार हवाय. दुर्दैवी घटना घडली ती शाळा भाजपावाल्यांची शाळा होती. आणि तक्रार करण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेला बसवून ठेवलं. लोक रस्त्यावर आले तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. आणि मिंधेंचे गँग लीडर म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला निर्लज्जपणे प्रश्न केला. आणि स्वतः मिंधेने हे राजकीय आंदोलन होते हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आपल्या महाराष्ट्रात आला कसा ? आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री ओरडून सांगतात यापूर्वी घडलेल्या एका बलात्का-याला फाशी झाली. कुठे फाशी झाली हे सांगा नाही तर तोंड दाखवू नका अशी टीका करत गृहमंत्री यांना विचारा यावर एफआयआर FIR का नाही घेतला ? तुम्ही किसन कथोरे, वामन म्हात्रे यांना का वाचवत आहात ? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानी, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे. पण गृहमंत्री राजकारणासाठी दिल्लीत बसले होते. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही. भाजपाला हद्दपार करत नाही तो पर्यंत लढाई संपणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त केला .

Check Also

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *