Breaking News

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची

‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत मशाल पेटवायची असल्याचानिर्धार आदित्य ठाकरे यांनी पैठणच्या सभेतून व्यक्त केला.

पैठण आणि वैजापूर येथे महाराष्ट्र स्वाभिमान येथे पार पडली. या स्वाभिमान सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की, देशात कांद्याची निर्यात बंदी विरोधात शिवसेनेने आवाज उठविला होता . केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची त्यांनी मागणी केली होती . पण त्यांनी तसं केलं नाही . भाजपाला जनतेनी त्याची जागा दाखवली आहे . शेत नुकसान भरपाईचे पंचनामे करुन सुध्दा राज्य सरकारने नुकसान भरपाई दिली नाही .उद्धव साहेब यांनी घोषित केलेल्या प्रमाणे कर्जमुक्ती केली होती . पण यांच्या कृषी कृषिमंत्र्यांना महाराष्ट्रतील जनतेने एकदाही बघितले नाही असं सांगितले

शेतकऱ्यांवर मागील दोन वर्षात मोठे संकट आले तरीही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही. सतत्त्याने आम्ही शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलो असतो. पिक विमा, अनुदान आमच्या सरकारच्या काळात मिळवून दिले. भाजपाला कांदा निर्यात बंदीचा मतदान मध्ये नुकसान होत असल्याने बंदी उठवली गेली. भाजपचा एकही आमदार उद्योग आणल्याचे बोलत नाही . भाजप महाराष्ट्र द्वेशी आहे, महायुतीचे एकही आमदार तरुणांना रोजगार मिळवून दिला असे म्हणु शकत नाही . पुण्यात तीन दिवस स्पर्धा परीक्षाचे अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत होते, पण लक्ष दिलं नाही . त्यामुळे येणारी निवडणूक आपल्या स्वाभिमानासाठी आहे . असं आदित्य ठाकरे म्हणाले .

अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे प्रमाण या शासनाच्या कार्यकाळात वाढले

आगामी विधानसभा निवडणुकीत मिंधे सरकारचे शासन येत नाही . बदलापूर घटनेत आंदोलन करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे प्रमाण या शासनाच्या कार्यकाळात अधिक वाढले आहेत. अनेक महिलांवर अत्याचार करणारे रेवन्ना यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला. बिल्कीस बानो या मुस्लिम महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही. इथे उध्दव साहेबांनी आपल्या मंत्रीमंडळ मधून काढून टाकलेल्या मंत्र्याला मिंधेनी मंत्री पद दिलय असं म्हणत सरकारवर आदित्य ठाकरेंनी टीका केली .

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *