Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संवाद झाल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया… शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबध नाही

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात ऑनलाईन पध्दतीने राज्यातील जनतेशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत भाष्य केले. त्यावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, हे जे शिवसेनेत चाललं आहे, त्याच्याशी भाजपाचा काहीही संबध नाही असे सांगत ते त्यांचे मनोगत आहे. त्यावर नो काँमेंट असे स्पष्ट केले.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला होता. त्याच गुलालाचा संदर्भ देत, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या विजयाचा तुमचा तो गुलाल अजून गेला नाही. आता ही विधानसभेची तयारी आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटलांनी, हा गुलाल आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवला आहे, असे म्हणत डोक्यावरील टोपी काढून दाखवली.

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहिर केले आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचेही सांगितले.

त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ते, त्यांचं मनोगत आहे. यावर माझं नो कॉमेंट. मी काहीही बोलू शकत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हणाले. दरम्यान पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी लगेच पुढच्या वाक्यामध्ये, हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असं स्पष्ट केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत