Breaking News

राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा श्रीनगर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

श्रीनगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या सरकारच्या वचनाचा पुनरुच्चार करत लोकांना आश्वासन दिले की भाजपा ही वचनबद्धता पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानाने दगडफेक आणि दहशतवादाबद्दल सहानुभूती असलेल्या पक्षांना नाकारले असल्याचा दावा केला.

इंडिया आघाडीच्यावतीने जम्मू येथील प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसंगी रस्त्यावरील लढाई लढू मात्र भाजपाने जम्मू काश्मीरचा काढू घेतलेला राज्याचा दर्जा परत मिळवून देऊ मात्र त्याची सुरुवात येथील विधानसभेतून करणार असल्याचे सांगत काहीही झाले तरी जम्मू आणि काश्मीरला असलेला राज्याचा दर्जा परत मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीनगर येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा परत देणार असल्याचे वक्तव्य केले.

यावेळी बोलतान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तीन कुटुंबांच्या राजवटीत नवीन पिढीला त्रास होणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे, स्थानिक रोजगार निर्मितीवर आपले सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचे आश्वासन देत २०१९ पासून झालेल्या सकारात्मक बदलांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू आणि काश्मीर J&K मधील सर्व शाळा आणि महाविद्यालये आता सामान्यपणे कार्यरत आहेत. तरुण पेन घेत आहेत, दगड नाही. शाळा जाळल्याच्या बातम्या ऐकण्याऐवजी आता आम्ही एम्स, आयआयटी आणि इतर पायाभूत सुविधांच्या बांधकामाबद्दल ऐकत असल्याचेही यावेळी सांगितले.

अप्रत्यक्षपणे नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदेशातील भूतकाळातील अस्थिर भूमिकेवर टीका करत म्हणाले, ३५ वर्षांपासून काश्मीर ३,००० दिवस बंद राहिले, पण २०१९ पासून ते आठ तासही बंद झाले नाही. तुम्हाला त्या संपाच्या दिवसात परत जायचे आहे का? असा सवाल करत जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा पुन्हा देणार असल्याचा आश्वासन दिले.

२५ सप्टेंबर रोजी नियोजित निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे पूर्वीचे रेकॉर्ड मोडण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. निवडणुकीचे उर्वरित टप्पे २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होतील तर ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहिर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत